Download App

राऊतांनी बाण सोडला! केसरकर म्हणजे मोती तलावातला डोमकावळा; दगा देत भाजपात जाणार

  • Written By: Last Updated:

मुंबई : राष्ट्रावादी फुटून सत्तेत आलेल्या अजित पवार गटामुळे शिंदे गटातील नेत्यांचे टेन्शन वाढलेले आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंचे खास शिलेदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपकडे जातील असा दावा केला आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदेंचे (CM Eknath Shinde) टेन्शन काहीसे वाढले असून, केसकर म्हणजे सांवतवाडीतील मोती तलावातला डोमकावळा असल्याची बोचरी टीका राऊतांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut Attack On Deepak Kesarkar & Shinde Group)

World Cup : टीम इंडियाची टेन्शन वाढलं; दिग्गज शुभमन गिल रूग्णालयात दाखल

केसरकर सावंतववाडीतील मोती तलावाचा डोमकावळा असून, त्यांचा शिवसेनेशी संबंध काय ? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. हे पदासाठी, सत्तेसाठी आल्याचे राऊत म्हणाले. यांना अर्थमंत्री, गृहराज्यमंत्री, आमदारकी दिली आणि आता हे शिवसेना काय हे आम्हाला शिकवताय का? असा संतप्त सवाल राऊतांनी उपस्थित केला. असले बाहेरचे लोक घेऊ नका यासाठी आमचा विरोध होता असे म्हणत हे शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपमध्ये जातील असा दावा देखील राऊतांनी यावेळी बोलताना केला.

शिवाजी पार्कवरून हल्लाबोल

येत्या 24 ऑक्टोबरला दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, दसऱ्या मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर नेमका ठाकरेंचा की शिंदेंचा मेळावा होणार यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, कोणत्याही गट-तटाकडून, गँग, टोळ्यांकडून दसरा मेळाव्यासाठी पालिका किंवा सरकारकडे मागणी केली असेल तर, त्या आधी अशा टोळक्यांनी आरशासमोर उभं राहत पाहावं आपण शिवसेना आहोत का?

Udhav Thackery यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार? शिंदे गटाचं एक पाऊल मागे

शिवसेना ठाकरेंची आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शिंदे कोण? कोणाला माहिती नसल्याचे सांगत जगात कुणालाही विचारा शिवसेना कुणाची तर, उत्तर मिळेल ठाकरेंची असा दावादेखील राऊतांनी यावेळी केला.दिल्लीच्या मदतीनं चिन्ह, पक्ष चोरल्याचे राऊत म्हणाले. अजित पवार यांना दिल्लीश्वरांनी चिन्ह आणि पक्ष त्यांनाच मिळेल असे प्रॉमिस केलेलं असा गौप्यस्फोटही राऊतांनी यावेळी केला. मात्र, तरीही शरद पवार आणि शिवसेना पक्ष एकाच बोटीतून प्रवास करत आहेत आणि निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे.

Tags

follow us