Bhaskar Jadhav Speech : दहा वर्षांपूर्वी १५ लाख रुपये देणार होते. पण ते कमी होत आता दीड हजार रुपये झाले आहेत. लाडक्या बहिणींना माहिती आहे त्यांचे भाऊ लबाड आहेत. बहिणींना खात्यातील एक पैसा ठेवला नाही कारण त्यांना माहिती आहे की भाऊ लबाड आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली. विजयादशमीनिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात जाधव बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले, आज राज्यात विश्वासघातकी सरकार आहे. सरकार विश्वासघात करून आलं म्हणजे सगळ्यांचा विश्वासघात करणारच आहे. एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात टिकेल असं आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता कदाचित दोन दिवसांत निवडणूक जाहीर होईल मग आरक्षणाची घोषणा कधी करणार असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. नरहरी झिरवळ मंत्रालयातील जाळीवर उडी मारतात याचा अर्थ या सरकारवर कुणाचा विश्वास नाही अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.
“फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र फडणवीस, त्यांनीच..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!
गुजरातचे खान महाराष्ट्रात येतात आणि उद्धव ठाकरेंवर टीका करतात. राज्याचे गृहमंत्री विरोधकांना ठोकून काढा म्हणतात अशा गृहमंत्र्यांनी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडवला आहे अशी घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
दरम्यान, याआधी सुषमा अंधारे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे. सांप्रदायिक विभाजन नको आहे. पण फडणवीसांनी राज्यात द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीसांना सल्ला द्यावा अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. फडणवीसांनी माणसातला माणूस ठेवला नाही असेही अंधारे म्हणाल्या. फडणवीस म्हणजे फेक नरेटिव्हचं महाकेंद्र आहे.
लाडकी बहीण योजना आमच्या डोळ्यांत खुपते असे फडणवीस म्हणतात. पण आमच्या डोळ्यांत खुपण्याचं काहीच कारण नाही. दीड हजार रुपये फडणवीसांनी काही नागपुरचा बंगला विकून दिले नाहीत. खरंतर ते पैसे जनतेचेच आहेत. फक्त ते पैसे महिलांना देण्याचं काम सरकारनं केलं आहे. सरकारचं काम फक्त पोस्टमनचं आहे. तुम्ही पोस्टमन आहात. त्याचे मोक्कार क्रेडिट घ्यायचे नाही.
Video : लाडक्या बहीणींनो 1500 रूपये कचकून घ्या: शिंदे-फडणवीस फक्त पोस्टमन; अंधारे बरसल्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापुरुषांचं राजकारण केलं. त्यांना राज्यातील एकही आंदोलन हाताळता आलं नाही. त्यांनी फक्त राज्यात दंगली घडवून आणल्या. त्यांनी महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं आणि आज तेच आम्हाला शहापण शिकवत आहेत, अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.