“फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र फडणवीस, त्यांनीच..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!

“फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र फडणवीस, त्यांनीच..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!

Sushma Andhare Criticized Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी द्वेषाचं राजकारण पसरवलं. महाराष्ट्रात सगळ्या जाती गु्ण्यादगोविंदानं नांदतात. पण त्यांच्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दरी निर्माण करण्याचं काम करत आहेत. विकासावर प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. सरसंघचालकांनी फडणवीसांना सल्ला द्यावा अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) हल्लाबोल केला. विजयादशमीनिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात अंधारे बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. 

अंधारे पुढे म्हणाल्या, आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे. सांप्रदायिक विभाजन नको आहे. पण फडणवीसांनी राज्यात द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीसांना सल्ला द्यावा अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. फडणवीसांनी माणसातला माणूस ठेवला नाही असेही अंधारे म्हणाल्या. फडणवीस म्हणजे फेक नरेटिव्हचं महाकेंद्र आहे.

दगाफटका करणाऱ्या पाचपैकी पहिल्या आमदाराला काँग्रेसचा दणका; सुलभा खोडके पक्षातून निलंबित

लाडकी बहीण योजना आमच्या डोळ्यांत खुपते असे फडणवीस म्हणतात. पण आमच्या डोळ्यांत खुपण्याचं काहीच कारण नाही. दीड हजार रुपये फडणवीसांनी काही नागपुरचा बंगला विकून दिले नाहीत. खरंतर ते पैसे जनतेचेच आहेत. फक्त ते पैसे महिलांना देण्याचं काम सरकारनं केलं आहे. सरकारचं काम फक्त पोस्टमनचं आहे. तुम्ही पोस्टमन आहात. त्याचे मोक्कार क्रेडिट घ्यायचे नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापुरुषांचं राजकारण केलं. त्यांना राज्यातील एकही आंदोलन हाताळता आलं नाही. त्यांनी फक्त राज्यात दंगली घडवून आणल्या. त्यांनी महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं आणि आज तेच आम्हाला शहापण शिकवत आहेत, अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.

महायुती सरकारकडून काय अपेक्षा करणार : बानुगडे पाटील

सत्ताधारी आमदार आणि मंत्रीच महिलांबाबत जर अपशब्द उच्चारत असतील तर या महायुती सरकारकडून काय अपेक्षा करणार. हा महत्वाचा प्रश्न आहे. किसान सन्मान निधीचे तुम्हा सहा हजार रुपये दिले म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या आहेत का? तीन महिन्यात ५१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असे म्हणत ठाकरे गटाचे नेते नितीन बानुगडे पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा :

काकांनंतर अजित पवारही ॲक्शन मोडमध्ये, काँग्रेसला देणार धक्का, 3 आमदारांचे इनकमिंग?

Letsupp Special : अमरावतीत नवनीत राणांचा पराभव : पडद्यामागचे पाच ‘हिरो’

आम्ही नौटंकी केली तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही, कडुंनी राणांना सज्जड दम भरला 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube