‘आम्ही नौटंकी केली तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही’; कडुंनी राणांना सज्जड दम भरला…

‘आम्ही नौटंकी केली तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही’; कडुंनी राणांना सज्जड दम भरला…

Bachhu Kadu : आम्ही नौटंकी केली तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही, या शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना सज्जड दम भरला आहे. अमरावतीत जाहीर सभा घेण्याच्या मुद्द्यावरुन बच्चू कडू आणि पोलिस प्रशासनात मोठा राडा झाल्याचं दिसून आलं होतं. पूर्व नियोजित मैदानावर सभेला ऐनवेळी परवानगी नाकारुन राणा यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्याने बच्चू कडू चांगलेच संतापले होते. अखेर आज प्रहारचे उमदेवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेतून बच्चू कडू यांनी राणांना दम भरला.

मोदींना कधीपासून मंगळसुत्राचं महत्व कळायला लागलं? उद्धव ठाकरेंचा उपरोधिक सवाल

बच्चू कडू म्हणाले, केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या जाहीर सभेला आम्ही गालबोट लावण्याचं काम केलं नाही. रवि राणा यांनी कालच्या अमित शाहा यांच्या सभेला गालबोट लावण्याचं काम केलं आहे. रवी राणा यांनी आमचं मैदान जाहीर सभेसाठी घेतलं आहे. आम्ही त्यांचं मैदान सभेसाठी घेतलं नाही. जाहीर सभेवरुन मोठा राडा झाल्यानंतर आम्हालाच नौटंकी करत असल्याचं ते म्हणत आहेत. पण त्यांना एकच सांगतो जर आम्ही नौटंकी केली तर तुम्हाला अमरावतीत पाय ठेवू देणार नाही, या शब्दांत बच्चू कडू संतापले.

मनोज बाजपेयींच्या वाढदिवशी चाहत्यांना निर्मात्यांकडून खास भेट, शेअर केला ‘बाग का करेजा’चा टीझर

निवडणूक अधिकाऱ्यांनाही दाखवतोच…
सध्याची लोकसभा निवडणूक होऊ द्या, मग निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवतो माझा प्रहार. अधिकारी वर्ग जर एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असतील तर आम्ही त्यांची खैर ठेवणार नाही. माझ्यावर आधीच 350 गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे लोकहितासाठी दाखल झालेले आहेत. लोकांच्या हितासाठी मी कधीही माघार घेतलेली नाही, असा इशाराही बच्चू कडू यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलीय, तर महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बच्चू कडू यांनी विरोध केला तरीही भाजपकडून राणांना उमेदवारी देण्यात आल्याने बच्चू कडू यांनी आपला उमेदवार दिनेश बुब यांना मैदानात उतरवलं आहे. अशातच काल दिनेश बुब यांची नियोजित सभा होती मात्र, ऐनवेळी सभेला परवानगी नाकारुन नवनीत राणा यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्याने बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारल्याचं दिसून आलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube