‘राणांना पाडण्यासाठी काहीही करणार’; उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंनी रणशिंग फुंकलं!
Amravati Loksabha : अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला अमरावतीतील स्थानिक नेत्यांसह प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी खुलेआम विरोध दर्शवला होता. तरीही विरोधकांच्या नाकावर टिचून नवनीत राणा यांनी भाजपकडून (BJP) तिकीट आणलं आहे. त्यावर बोलताना बच्चू कडू चांगलेच कडाडले आहेत. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी काहीही करणार असल्याचा पवित्राच बच्चू कडू यांनी घेतला आहे. त्यामुळे आता अमरावती लोकसभेत नवा ट्विस्टच पाहायला मिळणार आहे.
Thakishi Sanvad : जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य अन् गिरिजा ओककडून नव्या नाटकाची घोषणा
बच्चू कडू म्हणाले, नवनीत राणा यांनी घरात घूसून मारण्याची भाषा केली होती, आम्ही गुवाहाटीला खोके घेऊन गेलो असं ते म्हणाले होते. सरकार म्हणून फडणवीस फोन करतात पण अमरावतीच्या तिकीटाच्या वेळी फोन करीत नाही. आम्ही आमची भूमिका भाजपसमोर मांडली होती, मात्र भाजपकडून राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना मिळालेल्या उमेदवारीचा आम्ही ठामपणे विरोध करणार असून एकतर उमेदवार उभा करु नाहीतर या वेळेचा निकाल आम्ही नक्कीच देणार असल्याचं बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे.
साताऱ्याची जागा आमचीच, भाजप नेते ‘त्यांची’ समजूत काढतील : अजितदादांकडून उदयनराजेंच्या आनंदावर विरजण
तसेच अमरावतीच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतरही नवनीत राणा यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री शिंदेंसोबत करण्यात आलेल्या बैठकीला काही एक अर्थ नाही. आम्ही नवनीत राणा यांच्याविरोधातच ठामपणे राहणार आहोत. आम्ही विरोध केल्यानंतर महायुतीने जो काही निर्णय घ्याचा आहे तो घ्यावा. आम्ही आमचं कर्तव्य केलं बाकी काम त्यांचं आता आम्ही ठरवू. नवनीत राणा कशा पडतील त्यासाठी काहीही करु, युती जाहीर करताना आमचा विचार त्यांनी केला नसल्याचा आरोपही कडू यांनी यावेळी केला आहे.
एका खासदाराचही तिकीट कापणं किती महागात पडू शकतं हेच हेमंत गोडसेंनी दाखवून दिलं…
महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला होता. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक होत्या. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला होता. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली होती. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढू असा इशारा शिंदे गटाने दिला होता. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही, अशी गर्जना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी घेतली होती.