गृहखात्याला गांभीर्य नाही, बुलढाण्यासारखे अमरावतीमध्ये 8 गुन्हे; बच्चू कडूंचा धक्कादायक दावा

गृहखात्याला गांभीर्य नाही, बुलढाण्यासारखे अमरावतीमध्ये 8 गुन्हे; बच्चू कडूंचा धक्कादायक दावा

Bachhu Kadu Claim Crime in Amravati also Criticize Home Department : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढले आहे. ज्यामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राजकीय संबंधांमुळे प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर आता अशीच निर्घृण हत्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका माजी सरपंचाची झाली आहे.त्यावरून माजी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ

काय म्हणाले बच्चू कडू?

बुलढाण्यामध्ये जी माजी सरपंचाचच्या हत्येची घटना घडली आहे. ती अतिशय गंभीर आहे.अमरावतीमध्ये देखील असे 8 गुन्हे झालेले आहेत. मात्र गृहखात्याला यात गांभीर्य नाही का? गृहखात्यावर प्रश्न सध्या उपस्थित करण्यासारखे आहे. असं म्हणत माजी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

विरोधानंतर त्रिसूत्री भाषेचा निर्णय मागे; पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढली

नेमकं प्रकरण काय?

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे वंजारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमधून त्यांचं अपहरण झालं. त्यानंतर महिनाभर ते गायब होते. त्यानंतर आता लोणार पोलीस स्टेशनच्या एक किलोमीटरच्या अंतरावर त्यांची मुंडकं नसलेली बॉडी सापडली आहे.

माजी सरपंच महिनाभर गायब, मुंडकं नसलेलं धड पोलिस स्टेशन परिसरात; देशमुख हत्येची पुनरावृत्ती

दरम्यान त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या एका वर्षात आठ तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे ते मिसिंग झाल्यानंतर पीडित कुटुंब तीन वेळा पोलीस स्टेशनला गेलं होतं. त्यांनी आरोप केल्यापैकी एक आरोपी गेल्या महिन्याभरापासून फरार आहे. किरकोळ जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube