विरोधानंतर त्रिसूत्री भाषेचा निर्णय मागे; पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढली

विरोधानंतर त्रिसूत्री भाषेचा निर्णय मागे; पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढली

Third Launguage Remove from Time Table of First Standerd : राज्यातील शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून हिंदी (Hindi) भाषा शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयाला तीव्र विरोध झाल्याने मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांनी हा निर्णय रद्द केला. तसेच नरेद्र जाधव (Narendra Jadhav) यांच्या अध्यक्षेखाली एक समिती स्थापन करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढण्यात आली आहे.

पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढली

राज्य सरकारने घेतलेल्या शाळांसाठी पहिलीपासून तिसरी भाषा आणण्याच्या निर्णयाला विरोध झाला. त्यानंतर राज्य सरकारने त्रिसूत्री भाषेचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकातून हिंदी विषय हद्दपार करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दोनच भाषा शिकवल्या जाणार असून तिसऱ्या भाषेची सक्ती असणार नाही. तिसऱ्या भाषेच्या समावेशानंतर कमी केलेला कला, क्रीडा आणि कार्यानुभवाचा वेळ वाढवण्यात आला आहे.

माजी सरपंच महिनाभर गायब, मुंडकं नसलेलं धड पोलिस स्टेशन परिसरात; देशमुख हत्येची पुनरावृत्ती

हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे दोन्ही जीआर सरकारने रद्द केले आहेत. तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केली.

काही राक्षस मोकाट फिरताय; मीरा-भाईंदर अमराठी व्यवसायिकाच्या मारहाणीवर अभिनेता संतापला

त्रिभाच्या सूत्रांच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी? ती कशा प्रकारे करावी? मुलांना कोणता पर्याय द्यावा? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना करण्यात येईल. नरेंद्र जाधव हे कुलगुरू होते, ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. आपण त्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube