माजी सरपंच महिनाभर गायब, मुंडकं नसलेलं धड पोलिस स्टेशन परिसरात; देशमुख हत्येची पुनरावृत्ती

Former Sarpanch Killed as like Beed Santo Deshmukh in Buldhana : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढले आहे. ज्यामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राजकीय संबंधांमुळे प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर आता अशीच निर्घृण हत्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका माजी सरपंचाची झाली आहे.
काही राक्षस मोकाट फिरताय; मीरा-भाईंदर अमराठी व्यवसायिकाच्या मारहाणीवर अभिनेता संतापला
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे वंजारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमधून त्यांचं अपहरण झालं. त्यानंतर महिनाभर ते गायब होते. त्यानंतर आता लोणार पोलीस स्टेशनच्या एक किलोमीटरच्या अंतरावर त्यांची मुंडकं नसलेली बॉडी सापडली आहे.
#लोणार जिल्हा बुलढाणा : वंजारी समाजाच्या माजी सरपंच अशोक सोनुनेची निर्घृण हत्या. पोलीस स्टेशन मधून अपहरण, महिनाभर गायब करून थेट दोन हात, मुंडकं नसलेली बॉडी लोणार पोलीस स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर सापडली.
एका वर्षात आठ तक्रारी दिल्या होत्या माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मिसिंग… pic.twitter.com/UnqDfS0qNf— Deepak Kedar (@deepakkedardk) July 3, 2025
मेष, सिंह आणि धनु राशीसाठी आजचा दिवस अत्यंत खास, इतर राशींचे काय?
दरम्यान त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या एका वर्षात आठ तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे ते मिसिंग झाल्यानंतर पीडित कुटुंब तीन वेळा पोलीस स्टेशनला गेलं होतं. त्यांनी आरोप केल्यापैकी एक आरोपी गेल्या महिन्याभरापासून फरार आहे. किरकोळ जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सरकारसाठी रात्रभर काम अन्… भाजप आमदाराचं महिला सचिवाबद्दल वादग्रस्त वक्तव्य
याबाबत ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते दीपक केदार यांनी एक सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, या घटनेवर विधानभवनात कोण बोलणार? गरीब वंजारा समाजाचा कुणीच वाली नाही. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ या प्रकरणात गांभीर्याने चौकशी करावी. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेत त्यामध्ये आणि सीआयडीमार्फत चौकशी करावी. त्याचबरोबर वंजारी समाजाचे नेते भाऊ-बहीणसुद्धा यामध्ये भूमिका घेतील आणि या कुटुंबाला साथ देतील अशी अपेक्षा.