Download App

Defense Factory : टाटा परदेशात उभारणार डिफेन्स फॅक्टरी; काय आहे कंपनीचा प्लॅन?

डिफेन्स क्षेत्रात परदेशी कंपन्यांचे वर्चस्व आहे. पण हे पहिल्यांदाच घडत आहे की, एखादी भारतीय कंपनी परदेशात प्लांट तयार करणार आहे.

  • Written By: Last Updated:

Tata Group : टाटा समूहाची कंपनी परदेशात प्रमुख डिफेन्स प्लांट उभारण्याच्या मार्गावर आहे. तस पाहता डिफेन्स क्षेत्रात परदेशी कंपन्यांचं वर्चस्व आहे. पण हे पहिल्यांदाच घडत आहे की, एखादी भारतीय कंपनी परदेशात डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट तयार करणार आहे. (Tata Advanced Systems Ltd) ही टाटा समूहाची कंपनी आहे. (TASL) कॅसाब्लांका येथे हा प्लांट उभारण्याची शक्यता आहे. हा प्लांट सुरुवातीला रॉयल मोरोक्कन सशस्त्र दलांसाठी वाहने तयार करेल. फॅक्टरी दरवर्षी 100 कॅम्बेट वाहने तयार करू शकेल. प्लांट एका वर्षात उभारला जाईल.

Video: मेहबूब भावा तोंडाला लगाम लाव! अन्यथा..सगळा सातबारा बाहेर काढू; का भडकल्या रुपाली ठोंबरे

Tata Advanced Systems Limited सुद्धा भारतीय सैन्याला अशा लढाऊ वाहनांचा पुरवठा करते. ही वाहने मर्यादित संख्येत भारतीय लष्कराच्या सेवेत आहेत. ही वाहने लडाख सीमेवर तैनात करण्यात आली आहेत. सुकरण सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD & CEO), TASL, म्हणाले, हा करार TASL साठी खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. TASL आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) यांनी संयुक्तपणे चाकांचा आर्मर्ड प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

परदेशातील पहिले डिफेन्स युनिट

परदेशात भारतीय कंपनीने स्थापन केलेले हे पहिले मोठे डिफेन्स युनिट आहे. आजवर परदेशात एकाही भारतीय कंपनीने असे केलेले नाही. या प्लांटमध्ये सुमारे 350 लोकांना रोजगार मिळेल आणि कामाचा मोठा भाग भारतातही तयार होणार आहे. टाटा समूह अनेक दशकांपासून डिफेन्स क्षेत्रात काम करत आहे. कंपनीने आत्तापर्यंत डिफेन्स, निमलष्करी दल, राज्य पोलीस दलांसाठी लॉजिस्टिक आणि युद्धासाठी आवश्यक वस्तूंसह अनेक वाहने तयार केली आहेत. याशिवाय टाटा समूहाने लढाऊ विमाने, अत्याधुनिक वाहनांसह हलकी वाहने तयार करण्यावरही भर दिला आहे.

follow us