Download App

शिवसेना ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात…; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Shivsena : शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने भाजपासोबत एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटाला समर्थन दिले आहे. विविध पक्षातील अनेक नेतेमंडळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 99 चे माजी नगरसेवक संजय गुलाबराव अगलदरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (thackeray-group-big-leader-sanjay-agaldare-in-shinde-group)

पक्ष फुटला आधी तो सांभाळा; महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ; CM शिंदेंचं केसीआर यांच्यावर टीकास्त्र

यावेळी आमदार संजय शिरसाट, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, सुशांत शेलार, प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना राष्ट्रीय सचिव अभिजित अडसूळ, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे आदी उपस्थित होते.

सरकारी कर्मचाऱ्यांना झटका! काम नाही तर पगार नाही; ‘या’ राज्यात लागू झाला निर्णय

माजी नगरसेवक संजय अगलदरे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे आता संजय अलगदरे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ठाकरे गटाचे नेते असणारे संजय अगलदरे हे तीनवेळा नगरसेवक राहिले आहेत. एकदा वरळी तर दोन वेळा खार दांडा येथून नगरसेवक झाले आहेत. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अगलदरे यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

Tags

follow us