पक्ष फुटला आधी तो सांभाळा; महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ; CM शिंदेंचं केसीआर यांच्यावर टीकास्त्र

पक्ष फुटला आधी तो सांभाळा; महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ; CM शिंदेंचं केसीआर यांच्यावर टीकास्त्र

Eknath Shinde : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telangana Chief Minister KCR) हे सध्या सोलापूर, पंढरपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके (Bhagirath Bhalke)यांनी बीआरएसमध्ये (BRS) प्रवेश केला. यानंतर सभेला संबोधित करतांना केसीआर यांनी राज्य सरकारसह सर्वच राजकीय पक्षांवर टीकास्त्र डागलं. सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय का घेत नाही? वीज कंपन्याचं खासगीकरण का केल्या जातं? असे सवाल करत सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याची टीका केली. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. केसीआर यांचा पक्ष दिल्लीत फुटला, त्यांनी त्यांचा पक्षच सांभाळावा, असा खोचक सल्ला शिंदेंनी दिला. (We are able to take care of Maharashtra, you take care of your party; Chief Minister Eknath Shinde criticizes KCR)

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र त्यानंतर मतदानाचा अधिकार जनतेच्या हातात असतो. ते पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आले. त्यांच्याबद्दल जास्त भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. त्यांनी दर्शन घेतलं आणि ते निघून गेले, एकनाथ शिंदे म्हणाले.

केसीआर यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेविषयी विचारले असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, के. चंद्रशेखर राव यांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळावा. दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला ना, तो त्यांनी सांभाळावा… त्यांचं राज्य नीट सांभाळावं. त्यांच्या राज्यातल्या लोकांना सुविधा द्याव्यात. महाराष्ट्रातील सरकार राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहे. गेल्या ११ महिन्यांत महाराष्ट्र सरकारने जनतेला सुविधा दिल्या आहे. सर्व घटकांसाठी कार्य केले. त्यामुळेच त्यांच्या त्यांच्या दौऱ्याची दखल घेण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सरकारी कर्मचाऱ्यांना झटका! काम नाही तर पगार नाही; ‘या’ राज्यात लागू झाला निर्णय 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनीही केसीआर यांच्या सोलापुरातील केलेल्या शक्तीप्रदर्शनावरही भाष्य केलं. महाराष्ट्रात काय शक्तीप्रदर्शन करणार? इथली जनता महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी आहे. केसीआर यांनी आपलं शक्तीप्रदर्शन तिकडे तेलंगणात दाखवायला करायला हवं. आपली ताकत तेलंगणात दाखवायला हवी, अशी टीका केली.

जयंत पाटील, संजय राऊत या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वारंवार केसीआर यांना भाजपची बी टीम असल्याची टीका केली होती. यावरून सीएम शिंदेंनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधक आधी तर केसीआर यांचं स्वागत करत होते. त्यांना जेवण्याचं आमंत्रण देत होते. मग आता केसीआर भाजपची बी टीम कसे झाले? ही दुहेरी भूमिका आहे. केसीआर आले की अन्य दुसरे कोणीही आले, तरी महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी ती ठाम आहे, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube