Thane Metro Train : ठाणेकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झालंय. शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित ‘मेट्रो 4A’ ची ट्रायल रन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतलीयं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra fadanvis) यांनी पहिल्या ऐतिहासिक प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला आहे.
PM Modi Speech : जीएसटी बचत महोत्सव ते स्वदेशीचा मंत्र ; PM मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
ठाण्यात आज मेट्रो 4 आणि 4 अ धावलीयं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत मेट्रोची ट्रायल घेतली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचीही उपस्थिती होती. मेट्रो 4 आणि 4 अ ची 35 किमी लांबी असून या मेट्रोचं काम 2027 पर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणार असून या मेट्रोसाठी 16 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी आज ऐतिहासिक दिवस असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेंचं खास कौतूक
मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विशेष अभिनंदन करतो, त्यांनी मेट्रोचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती त्यासाठी स्वत: लक्ष घालून अनेक अडचणी सोडवल्या. अडचणी दूर करुन मोगरपाडातील जमीन डेपोसाठी मिळवून दिली. प्रताप सरनाईक यांनीही त्यासाठी प्रयत्न केले त्यामुळेच मेट्रोला वेग आला असल्याने त्यांचं विशेष अभिनंदन करीत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
IND vs PAK Asia Cup 2025 : हँडशेक प्रकरणानंतर पाकिस्तानची फजिती! उद्या सामन्यात नवा ड्रामा होणार?
ठाणे मेट्रोची 10 स्टेशनं कोणती?
1) कॅडबरी
2) माजीवाडा
3) कपूरबावाडी
4) मानपाडा
5) टिकूजी -नी -वाडी
6) डोंगरी पाडा
7) विजय गार्डन
8) कासरवाडावली,
9) गव्हाणपाडा
10) गायमुख
दरम्यान, मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिंकांवर मिळून 32 स्टेशन असणार आहेत. तीन टप्प्यात विभागलेला वडाळा ते कासारवडवलीपर्यंत विस्तारित मार्ग जवळपास 80 टक्क्यांपेक्षा पूर्ण झाला आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग 2027 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.