Download App

घराचं छत कोसळून दोघांचा मृत्यू; मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातील घटना, मदतकार्य सुरू

मुंबईत विजय नगर परिसरात अपघाती घटना घडली. येते घराचे छत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Mumbai Antop Hill House collapsed : मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातील विजय नगरमध्ये एका घराचे छत कोसळून दुर्घटना घडली आहे. यात घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. (House collapsed) शनिवारी रात्री ही घटना घडली. बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून मदतकार्य सुरू आहे. (Mumbai) एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Sharad Pawar : राज्यकर्ते कांदा उत्पादकाला न्याय मिळण्यासारखे निर्णय घेत नाही

या अपघातामध्ये काहीजण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यातील जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओम क्रिष्णा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील एका घराचे छत कोसळलं आणि हा अपघात घडला.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी ठाण्यात कल्वार भागामध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला होता. यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर आठवड्यापूर्वी एका घराचे छत कोसळून मुंबईत पित्रा-पुत्राचा मृत्यू झाला होता. 10 वर्षीय मुलगा आपल्या सुरक्षारक्षक असलेल्या वडिलांना डब्बा देण्यासाठी आला होता. त्यावेळी ही घटना घडली होती.

follow us

वेब स्टोरीज