Sharad Pawar : ‘राज्यकर्ते कांदा उत्पादकाला न्याय मिळण्यासारखे निर्णय घेत नाही’

Sharad Pawar : ‘राज्यकर्ते कांदा उत्पादकाला न्याय मिळण्यासारखे निर्णय घेत नाही’

Sharad Pawar : कांदा उत्पादकाला न्याय मिळेल, असे निर्णय राज्याकर्त्यांकडून घेतले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पुण्यातील पुरंदरमधील आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांबद्दल भाष्य केलं आहे.

मुंबईतल्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगोचं अनावरण अन् त्यामध्ये काय असणार? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

शरद पवार म्हणाले, राज्यातल्या शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत, उत्पादन खर्चाचा विचार करुन सरकारने शेतकऱ्यांना रास्त किंमत दिली पाहिजे, देशातला कांदा परदेशात जातो, त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारल्याचा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला आहे.

ठाणे महानगरपालिकेत नर्स पदांची बंपर भरती, परीक्षा नाही, थेट मुलाखत देऊन मिळवा नोकरी

तसेच कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी असून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगली किंमत देणं ही सरकारची जबाबदारी असून कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, हा शेतकऱ्याचा अधिकार आहे, केंद्राने कांद्याला 2410 रुपयांचा भाव दिला आहे, आज कांदा उत्पादनाचा खर्च पाहिला तर 2410 किंमत पुरेशी नाही, त्यामध्ये वाढ केली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

Video : हिमाचलच्या कुल्लूमध्ये भुस्खलन; क्षणार्धात जमीनदोस्त झाल्या इमारती, अनेकजण अडकले

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क रद्द करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा, त्यानंतरच शेतकऱ्यांचा कांदा परदेशात जाणार असून त्यानंतरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत याचा निकाल होत नाही, तोपर्यंत कांदा उत्पादकाला न्याय मिळणार नाही. कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी असल्याचंही ते म्हणाले आहेत.

कांद्यानंतर आता केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवरही बंधन आणणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर वेगळा निर्णय़ घेण्याची शक्यता असून त्यामुळे कष्टकरी शेतकऱ्याच्या मागे उभं राहुन अंतिम धोरणांचा विचार केला पाहिजे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube