Download App

Uddhav Thackery : आमचा प्रश्न अदानींना होता, गावभर चमचे का वाजताय?; ठाकरेंची ‘राज’ ठाकरेंवर बोचरी टीका

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackery : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून (Dharavi Redevelopment Project) अदानी समूहाविरोधात शनिवारी (16 डिसेंबरला) मोर्चा काढण्यात आला होता. त्यावरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर उद्धव यांनी आज (18 डिसेंबरला) प्रत्युत्तर दिले ते माध्यमांशी बोलत होते.

प्रश्न अदानींना, चमचे का वाजताय?

पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला की, उद्धव ठाकरे यांच्या धारावी प्रकल्प विरोधातील मोर्चावर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला आता कळत आहे की, आदाण्याची चमचे नेमके कोण कोण आहेत? आम्ही प्रश्न आदानीला विचारला होता चमचे गावात का वाजत आहेत. तसेच आंदोलनाला गेल्यानंतर विषय काय आहे? असे विचारून जे बोलायला सुरुवात करतात. अशा अर्धवट माहिती असणाऱ्यांनी प्रश्न विचारू नयेत. तसेच विमानाला कोणताही टोल लागत नाही. त्यामुळे हा विषय देखील तिकडे येत नाही. त्यामुळे अर्धवट माहिती असणारे प्रश्न विचारू नयेत. शालीच वजन पेलते का नाही? हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहिती नुसार प्रश्न कोणी विचारू नयेत. अशा प्रश्नांना मी उत्तर देत नाही.’ असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.

Giriraj Singh : हिंदुंनो हलाल नाही तर झटका मटणच खा! केंद्रीय मंत्र्यांनी दिला सल्ला

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तसेच हा मोर्चा सेटलमेंट साठी नव्हता करण्याच्या भाजप नव्हती हा मोर्चा महाविकास आघाडीने काढला होता मोर्चामध्ये जर भाजप असतं तर सेटलमेंट झाले असती. असंही उत्तर उद्धव ठाकरेंनी यावेळी राज ठाकरे यांना दिलं आहे.

Advance Booking: किंग खानचा ‘डंकी’ तर प्रभासच्या ‘सालार’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘काटे की टक्कर’

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या धारावीमधील मोर्चावर प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, आदानींना हा प्रकल्प देण्याचं कंत्राट काढून दहा महिने झाले. मग आज हा मोर्चा का काढला जातोय? की, सेटलमेंट होत नाही. म्हणून मोर्चा काढला जातोय. असा सवाल ठाकरेंच्या मोर्चावर राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी डेव्हलपमेंटसाठी एक प्लॅन असतो. त्यांच्याकडे आहे का? हे आदणींना विचारा. शाळा किती? ओपन स्पेस किती? सगळी माहिती पाहिजे. असा सल्ला देखील राज यांनी दिला होता.

follow us

वेब स्टोरीज