Ujjwal Nikam returns as special public prosecutor : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election/strong>) पराभव पचवावे लागलेले अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. विधी व न्याय विभागाने निकम यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. परंतु त्यावरून आता उज्ज्वल निकम व राज्य सरकार यांना विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे.
‘पिकनिक’ शब्दाचा अर्थ काय? कधी सुरू झाला पिकनिक डे?; जाणून घ्या, खास माहिती..
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने उत्तर-मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरविले होते. ते विशेष सरकारी वकील असल्याने ते सरकारी पदावर होते. त्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी त्यांना पराभूत केले. एका अर्थाने राजकारणात उज्ज्वल निकम हे अपयशी ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंधराच दिवसात उज्ज्वल निकम यांची आता विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूतही होऊन उज्ज्वल निकम यांची फेरनियुक्ती करणे म्हणजे बक्षीस मिळाले असल्याची राजकीय टिप्पणी सुरू झाली आहे.
ब्रेकअप झालं, राग डोक्यात शिरला अन् भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; वसईतलं थरकाप उडवणारं हत्याकांड
निवडणूक लढण्यापूर्वी उज्ज्वल निकम यांच्याकडे विशेष सरकारी वकील म्हणून 26 हून अधिक खटले होते. त्यात खून प्रकरणातील महत्त्वाचे खटले आहेत. त्यातील खटल्यांची सुनावणी सुरू आहे. काही खटले अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम यांची सरकारने पुन्हा फेरनियुक्ती केल्याचे म्हटले जात आहे.
सरकारी वकीलही भाजपचे राहणार का?
उज्ज्वल निकम यांची फेरनियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसने या नियुक्तीला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली आहे. राज्य सरकारने न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पाप केलं आहे. उज्ज्वल निकम भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना त्यांना सरकारी वकील करून त्यांनी सिद्ध केले की सरकारी वकीलही भाजपचे राहणार. पण भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असे पटेल यांनी म्हटले आहे.