पुण्यात एकामागे एक अपघात सुरूच; मर्सिडीज बेंझने एका दुचाकीस्वाराला चिरडले!

पुण्यात एकामागे एक अपघात सुरूच; मर्सिडीज बेंझने एका दुचाकीस्वाराला चिरडले!

Pune Accident Mercedes Benz Crushed one : पुण्यामध्ये आज पुन्हा एकदा एका मर्सिडीज बेंज (Mercedes Benz ) या गाडीखाली एका 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अल्पवयीन तरुणाने पोर्शे (Pune Accident ) या महागड्या कारने दोघांना उडवत त्यांचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना वारंवार घडतच आहेत. त्यामध्ये आज आणखी एका अपघाताची भर पडली आहे. त्यामुळे पुण्याची वाहतुक आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमका कसा झाला अपघात?

पुण्यातील येरवडा भागात आज (18 जून) दुपारी 1 वाजता असणाऱ्या गोल्फ कोर्स जवळ हा अपघात घडला. यामध्ये आलिशान मर्सिडीज बेंझ या गाडीखाली चिरडून 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली आहे. केदार मोहन चव्हाण (41) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मर्सिडीज बेंझ ही अलिशान गाडी चालवणाऱ्या नंदू अर्जुन ढवळे नावाच्या चालकाने त्याला उडवले आहे.

मुंबई-दिल्लीलाही पछाडले! ‘या’ शहरात इलेक्ट्र्रिक कार सुसाट; एकाच वर्षात रेकॉर्डब्रेक विक्री

स्थानिकांनी चव्हाण यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चालकाला ताब्यात घेतले आहे. तर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Rahul Gandhi यांचा मोठा दावा; एनडीएचे काही लोक आमच्या संपर्कात, छोटी चूकही सरकार पाडू शकते

कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपपत्र दाखल होणार…

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीसह इतर आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भक्कम तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. या सर्व पुराव्यांच्या आधारे जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज