मुंबई-दिल्लीलाही पछाडले! ‘या’ शहरात इलेक्ट्र्रिक कार सुसाट; एकाच वर्षात रेकॉर्डब्रेक विक्री
Electric Car in India : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ सातत्याने वाढत (Electric Car in India) चालली आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या लोकांनी आता इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) विचार सुरू केला आहे. त्यामुळे या वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत चालली आहे. मागील वर्षात देशात चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांची चांगली विक्री झाली. कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहरात (Benguluru) चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांची सर्वाधिक विक्री झाली. दिल्ली, मुंबई आणि पुणे या शहरांना बंगळुरुने पछाडले.
मागील वर्षात बंगळुरूमध्ये ८ हजर ६९० वाहनांची विक्री नोंदवण्यात आली. सन २०२२ मध्ये २ हजार ४७९ वाहनांची विक्री झाली होती. म्हणजेच फक्त एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तिप्पट वाढली आहे. जतो डायनॅमिक्स इंडियाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली. मागील वर्षात संपूर्ण भारतात तब्बल ८७ हजार ९२७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली. सन २०२२ च्या तुलनेत यामध्ये तब्बल १४३.७ टक्के वाढ झाली आहे. २०२३ मध्ये इलेक्ट्रिक कार नोंदणीच्या बाबतीत दिल्ली शहर (Delhi News) दुसऱ्या क्रमांकावर राहिले. यावर्षी दिल्लीत ८ हजार २११ कारची विक्री झाली.
Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीने रचला इतिहास! दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईला 100% वीज पुरवठा
हैदराबाद, मुंबई आणि पुणे या शहरात अनुक्रमे ६ हजार ४०८ युनिट्स, ५ हजार ४२५ युनिट्स आणि ३ हजार ९९१ युनिट्ससह तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिले. सन २०२२ मध्ये मुंबई शहर अव्वल होते. या वर्षात शहरात एकूण ४ हजार ७४५ इलेक्ट्रिक कारची विक्री झाली होती. दिल्ली, पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद अनुक्रमे ३ हजार ७४८ युनिट्स, २ हजार ९१४ युनिट्स, २ हजार ४७९ युनिट्स आणि २ हजार २२५ युनिट्ससह टॉप पाचमध्ये सहभागी शहरे होती.
सन २०२० आणि २०२१ मध्ये दिल्ली आणि मुंबई ही शहरे आघाडीवर होती. या वर्षांत दिल्लीत ४४२ आणि मुंबईत १ हजार ७०० युनिट्स कारची नोंदणी झाली होती. इलेक्ट्रिक कारमध्ये रोज नवीन मॉडेल्सची पडणारी भर, वाढते चार्जिंग स्टेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा, अनुदानाची उपलब्धता, मागणीत सातत्याने होणारी वाढ या कारणांमुळे भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढतच चालली आहे.
Pune Car Accident : वेदांत, विशाल अन् आता आजोबा; अख्ख अग्रवाल कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात
बंगळुरू शहरात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना जतो डायनॅमिक्स इंडियाचे अध्यक्ष रवी भाटिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. शहरातील चांगले रस्ते, चार्जिंगसाठी अनुदानित वीज, सर्वदूर चार्जिंग स्टेशनचा विस्तार यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीला प्रोत्साहन मिळत आहे असे भाटिया यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.