Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीने रचला इतिहास! दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईला 100% वीज पुरवठा
Adani Electricity : यंदाच्या दिवाळीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीने (Adani Elecrtricity) इतिहास रचला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांना 100 टक्के नवीकरणीय ऊर्जेतून 24 तास वीजपुरवठा केला आहे. मुंबईकरांना 100 टक्के वीज पुरवठा करुन अदानी इलेक्ट्रीसिटीने ऐतिहासिक कामगिरी कामगिरी केली आहे. हरित ऊर्जेच्या दिशेने अदानी इलेक्ट्रीकने मोठं पाऊल उचलल असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अदानी समूहाने एक प्रसिद्धीपत्रकच जारी केलं आहे.
“रामदास कदमांना गद्दारीचा मोठा इतिहास” : उत्तर-पश्चिम मतदारसंघावरुन शिंदेंचे ‘वाघ’ भिडले
अदानी समूहाने एक प्रसिद्धीपत्रकात म्हटले, मुंबईतील 30 लाख घरे आणि इतर आस्थापना, एकूणच 1.2 कोटी मुंबईकरांना नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांकडून वीज पुरवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर, 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत, अदानी इलेक्ट्रिसिटीने सौर आणि पवन ऊर्जेसारख्या उर्जा स्त्रोतांद्वारे आपल्या ग्राहकांच्या विजेच्या गरजा पूर्ण केल्या असल्याचं नमूद केलं आहे.
Sharad Pawar यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात लखोजीराव जाधवांचे वंशज मैदानात
तसेच 2023 मध्ये आम्ही ग्राहकांच्या 38% विजेच्या गरजा स्रोतांमधून पूर्ण केल्या आहेत. 2027 पर्यंत हा पुरवठा 60% पर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य असून या ऊर्जेचा फायदा घेऊन, आम्ही शहरात प्रदुषण कमी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर, दिवाळीत बहिण-भावांचं बाँडिंगही दिसले !
अदानी इलेक्ट्रिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल म्हणाले, या ऊर्जेतून 100% पुरवठा साध्य करणे हा मुंबईच्या ऊर्जा संक्रमणातील पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे, ही ऊर्जा मुंबईला अधिक चांगल्या दरात विश्वसनीय आणि शाश्वत वीज देऊ शकणार आहे. आम्ही केवळ दिव्यांचा उत्सवच साजरा करत नाही, तर एक चांगले आणि शाश्वत भविष्यही साजरे करत आहोत. या ऐतिहासिक प्रवासाचा भाग असलेल्या सर्व मुंबईकरांसोबत ही अभूतपूर्व बातमी सांगताना आम्हाला आनंद होत असल्याचं पटेल म्हणाले आहेत.
अजितदादा-पवारांच्या भेटीत अनेक रहस्य, पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
दरम्यान, दिवाळी हा दिव्यांचा सण असून दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. मात्र, दिवाळीच्या काळात आपण फटाके फोडून जाणीवपूर्वक किंवा नकळत पर्यावरणाची खूप हानी करत असतो. दिवाळीच्या दिवशी अदानी इलेक्ट्रिसिटीने मुंबईतील ग्राहकांना पूर्णत: नवीकरणीय ऊर्जेतून २४ तास वीजपुरवठा केला आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीचा हा उपक्रम एक ऐतिहासिक पाऊल आहे.