अजितदादा-पवारांच्या भेटीत अनेक रहस्य, पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Ravi Rana on Sharad Pawar : काल प्रतापराव पवार यांच्या घरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट झाली. त्या भेटीनंतर लगेच अजितदादा दिल्लीला रवाना झाले. या दोन नेत्यांच्या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना ऊत आला. राजकीय विश्लेषक या भेटीचे वेगळे अर्थ काढतात. अशातच आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मोठं विधान केलं. अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीत अनेक रहस्य आहे. शरद पवार मोदींना पाठिंबा देतील, असं वक्तव्य त्यांनी केलं.
अजितदादा-शरद पवारांच्या भेटीत अनेक रहस्य, पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली होती. राष्ट्रवादीत सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट आहेत. अजित पवार गट सत्तेत तर शरद पवार गट विरोधात आहे. सध्या राष्ट्रवादीतील दोन्ही गटात पक्षाच्या चिन्हावरून वाद सुरू झाला. इतकचं नव्हे तर अजित पवार गटाने सुप्रिया सुळे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. अशातच काल शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली. याभेटीवर बोलतांना आमदार राणा म्हणाले की, अजितदादा आणि शरद पवार यांच्या भेटीत अनेक रहस्य आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. शरद पवारांनी मोदींसोबत यावं यासाठी अजितदादा अजूनही प्रयत्नशील आहेत, असं राणा म्हणाले.
आज अमरावतीत ते माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांना अजित पवारांनी ज्या प्रकारे पाठिंबा देत विकासाला साथ दिली. तशीर शरद पवार यांनीही द्यावी, यासाठी अजितदादा अजूनही प्रयत्नशील आहेत. अजित पवार आणि शरद पवाराच्या भेटीत अनेक रहस्य आहेत. कालच्या भेटीत राजकीय चर्चा झालेली असू शकते. अजित दादा शरद पवारांना कन्वेन्श करत आहेत. मला ठाम विश्वास आहे की शरद पवार देखील लवकरच पंतप्रधान मोदींची विकासकामे पाहून त्यांना पाठिंबा देतील. लवकरच तुम्हाला असे चित्र दिसेल, रवी राणा म्हणाले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय घडामोडी घडतील आणि शरद पवार मोदींसोबत सरकार मजबूत करतील. भविष्यात विधासभा आणि लोकसभा निवडणूकीपूरवी कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपसोबब दिसततील, विरोधी पक्षात लोक कमी असतील, असंही राणा म्हणाले.
मंत्रीपदाबाबत विचारले असता राणा म्हणाले की, मला मंत्रीपदाबाबत इंटरेस्ट नाही. जनेच्या प्रश्न मझ्यासाठी महत्वाचे आहेत.
शरद पवार सूचक विधान
शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. ही भेट दिवाळीनिमित्त असल्याचे सांगण्यात आलं. आता शरद पवार यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी अजित पवार आणि इतर कुटुंबीयांच्या भेटीबाबत उल्लेख केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चढ-उतार असतात. अडचणी येतात. वेळेप्रसंगी काही संकटाना सुध्दा तोंड द्यावं लागतं. पण, आयुष्यात दरवर्षी काही दिवस असे असतात की, संकटाचं विस्मरण करून कुटुंबासोबत काही दिवस घालवावे, कुटुंबासोबत जगावं अशी इच्छा आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं.