’15 दिवसांत शरद पवार मोदींना पाठिंबा देणार’; रवी राणांच्या दाव्याने खळबळ

’15 दिवसांत शरद पवार मोदींना पाठिंबा देणार’; रवी राणांच्या दाव्याने खळबळ

Mla Ravi Rana : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राज्यात मोठा भूकंपच झाल्याचं मानलं गेलं. राष्ट्रवादीचा मोठा सत्तेत सामिल झाल्यानंतर अजित पवारांसह समर्थकांना मंत्रिपदेही मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार गट पडल्याचं स्पष्ट झालं. दोन्ही गटामध्ये जोरदार खडाजंगी सुरु असतानाच आता आमदार रवी(Ravi Rana) यांच्या दाव्याने राज्याच्या खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतयं.

मणिपूरसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मिरमधून बड्या अधिकाऱ्याची रवानगी

आमदार रवी राणा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम पाहुन अजित पवारांनी सत्तेत सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 15 दिवसांतच पाठिंबा देणार असल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे.

MPSC Chairman : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी दिलीप पांढरपट्टे यांची नेमणूक !

तसेच पुढे बोलताना रवी राणा म्हणाले, मुंबईला आठ दिवसांपूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो. तेव्हा देशात पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे काम सुरू आहे, त्यांचं काम पाहून अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यांनी केंद्रातही देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची 100 एकरात जाहीर सभा, पुढचं प्लॅनिंग काय?

शरद पवारांनीही पंतप्रधान मोदींच्या कामाला पाहून पाठिंबा द्यायला हवा. त्यांनी सरकारमध्ये सामील झालं पाहिजे. शरद पवारांनी केंद्र आणि राज्यात सरकारला पाठिंबा द्यायला पाहिजे, असं साकडं लालबागच्या राजाकडे घातलं असल्याचं रवी राणांनी स्पष्ट केलं आहे.

‘पाय ओढण्याचं काम काँग्रेसमध्येच’; ‘स्फोट होणार’ म्हणणाऱ्यांवर बावनकुळेंचा पलटवार

मी राज्यभर गणपतीचं दर्शन करत फिरलो आहे, यादरम्यान, शरद पवारांनी मोदींना पाठिंबा द्यावा, हीच प्रार्थना केली आहे, त्यामुळे पुढील 15 दिवसांत हा चमत्कार दिसणार आहे, असा दावा रवी राणांनी केला आहे. रवी राणांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात एकच चर्चा रंगू लागल्याचं पाहायला मिळतयं.

शरद पवार सरकारसोबत आल्यास अजितदादा मुख्यमंत्री :
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. ते आता उपमुख्यमंत्री झाले आहेत. ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदेही नगरविकास मंत्री होते. ते आता मुख्यमंत्री झाले आहेत. शरद पवार सरकारमध्ये सामिल झाले तर अजित पवार उपमुख्यमंत्रीचे मुख्यमंत्री होणार असल्याचंही रवी राणा म्हटले आहेत. राजकारणात कोणतीही शक्य असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube