Aaditya Thackeray On BJP : जनता अदालत आम्ही घेतली होती. त्यानंतर खोके सरकार क्रूरपणे वागायला लागले आहे. त्यांच्या मनातील बदल्याची भावना लोकांना दिसत आहे. जनता अदालत झाल्यानंतर सूरज चव्हाण (Suraj chavan) यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्या कंपनीचे मालक मिंधे गटात आहेत. ते त्यांचे नेते आहेत. त्यानंतर राजन साळवी (Rajan Salavi) यांच्यावर धाड पडली. त्यानंतरही त्यांनी चांगली भूमिका घेतली की आम्ही कुठंही जाणार नाही. आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहोत. रविंद्र वायकर यांच्यावर देखील असाच दबाव आहे. दबावतंत्र वापरुन एकतर भाजपात या किंवा मिंधे गटात या, पण सगळेच निडरपणे लढत आहेत, असा हल्लाबोल आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की ज्यांच्यावर धाडी पडल्या आहे ते सांगत आहे की आम्ही काही चुकीचे केलं नाही. आमच्याकडे लपवण्यासारखे असते, चुकीचे काही असतं तर आम्ही शरण आलो असतो. जसं बाकीचे लोक वॉशिंगमशीनमध्ये आले आहेत. कोण घटनाबाह्य मुख्यंत्री झालं, कोण उपमुख्यमंत्री झालं पण रविंद्र वायकर, राजन साळवी, सूरज चव्हाण यांच्यासारखे सगळेच लढत आहेत. ते सांगत आहेत की आम्ही काही चूक केली नाही. चूक केली असती तर तुमच्याकडे आलो असतो. चूक केली नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत.
Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; राज्य सरकारकडूनही सुट्टी जाहीर!
ते पुढं म्हणाले की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा परदेशी दौरा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. मागच्या वर्षी परदेशी दौऱ्यावर मोठा खर्च झालेला आहे. गेले दोन वर्ष मुख्यमंत्री गरागरा परदेशात फिरतात आणि इथं पण फिरतात. पण कामशून्य होतं कारण त्यांची कार्यक्षमता नाही.
मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस, 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश
गेल्या वर्षी दावोस दौऱ्यात 40 खोक्यांचा खर्च झाला. 40 खोके म्हणजे 40 कोटी. त्यातून शून्य निषन्न झाले आहे. गेल्या वर्षी हजारो कोटींच्या केलेल्या कराराचे काय झालं? काही झालं असेल तर उद्योगमंत्र्यांनी फोटोसह काय कारवाई झाली आहे हे दाखवावं, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.