पुण्याची पोरगी, गोड आवाजात म्हटलेलं श्रीरामांचे गाणं अन् मोदींना भुरळ
PM Narendra Modi Praised Aarya Ambekar Suresh Wadkar: अयोध्येत 22 जानेवारीला (Ayodhya) राम मंदिरच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. भव्य उद्घाटनापूर्वी देशातील करोडो भक्तांच्या मुखी रामाशी संबंधित गाण्याचे बोल आहेत. बिहारच्या स्वाती मिश्राच्या (Swati Mishra) ‘राम आयेंगे’ (Ram Ayenge) या गाण्याची भूरळ खुद्द पंतप्रधानाना (PM Narendra Modi ) पडली. त्यानंतर आता पुण्याच्या मराठामोळ्या गायिकेच्या आवाजाचे देखील मोदी भक्त झाले आहेत. ही गायिका दुसरी तिसरी कुणी नसून काही वर्षांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्पस् मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आंबेकर (Arya Ambekar) आहे.
स्वाती मिश्राच्या राम आयेंगेनंतर सध्या सोशल मीडियावर आर्याने गायलेलं “हृदय मै श्रीराम है” या गाण्याने भक्तांना वेडं लावलं आहे. देशातील करोडो नागरिकांसह आर्याच्या गोड आवाजाची जशी भूरळ पडली आहे तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आर्याच्या गोड आवाजाची भूरळ पडली आहे. हे गाणे ट्विट करत मोदींनी सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकरचं तोडं भरून कौतुक केले आहे.
हे गाणं शेअर करताना मोदींनी ‘अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. हीच भावना सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी त्यांच्या सुमधूर स्वरात गुंफली असल्याचे म्हटले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी आर्याचे गाणं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केल्याने आर्याचा आनंद गगनात मावेनासा झाला असून, तिने मोदींच्या पोस्टचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.
यावेळी तिने मोदींची आणि त्यांच्या कामाची एक प्रामाणिक चाहती असताना त्यांची ही पोस्ट पाहून माझे डोळे पाणावल्याने तिने म्हटले आहे. आपलं गाणं मोदींनी शेअर केल्याचा आनंद शब्दात सांगू शकत नसल्याच्या भावाना तिने यावर कमेंट करताना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर तुफान गाजणाऱ्या ‘राम आएंगे तो…’ गाण्याची गायिका नेमकी आहे तरी कोण?
आमचा हा खारीचा वाटा, ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली. प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू आमच्यापर्यंत पोहचल्याचं तिने म्हटले आहे. मोदींना भुरळ पाडणारं ‘हृदय मै श्रीराम है’ हे गाणं सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकरनं स्वरबद्ध केलेले असून, गीतकार आणि कवी संदीप खरे यांनी शब्दांकित केले आहे. तर, गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ते संगीतबद्ध केले आहे.