Sharad Pawar : क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला (Wankhede Stadium) आज (१९ जानेवारी) पन्नास वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी वानखेडे स्टेडियम कसं उभं राहिलं? याचा किस्सा सांगितला. तसचं क्रिकेट (Cricket) हा धर्म म्हणून या देशाने स्वीकारला. या देशातील जनतेने क्रिकेटर्सचा नेहमीच सन्मान केला, असंही ते म्हणाले.
राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात FIR दाखल, देशाची एकता अन् अखंडता धोक्यात आणल्याचा दावा…
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्यासह क्रिकेट जगतातील अनेक खेळाडू आणि राजकारणी उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, वानखेडे स्टेडियम हे भारताच्या नव्हे तर जगाच्या क्रिकेटविश्वातील एक उत्तम स्टेडियम आहे. या स्टेडियमवर देशाची प्रतिष्ठा वाढणारे अनेक उत्तम खेळाडू तयार झाले. क्रिकेट हा धर्म म्हणून या देशाने स्वीकारला. या देशातील जनतेने क्रिकेटर्सचा नेहमीच सन्मान केला. या खेळाचे दोन भाग आहे. मैदान गाजवणारे आणि मैदान तयार कऱणारे. आम्ही मैदान तयार केलं, असं ते म्हणाले.
CM देवेंद्र फडणवीसांचे झ्युरिकमध्ये मराठी बंधू-भगिणींकडून जल्लोषात स्वागत, पाहा फोटो…
पुढं ते म्हणाले की, आम्ही प्रशासक आहेत. 52 वर्षापूर्वी राज्य सरकारमध्ये मी मंत्री होता. तेव्हा बॅरिस्टर शेषराव वानखेडे साहेबांनी मला बोलावलं आणि ही जागी आम्हाला क्रिकेट असोशिएशसाठी हवीय असं सांगितलं. मी मुख्यमंत्र्यांना सांगून ही जागा मुंबई क्रिकेट असोशिएशनला दिली होती. पण हे स्टेडियम उभं राहिलं याचं शभंर टक्के श्रेय हे वानखेडे साहेबांचं आहे. वानखेडे यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून उभं हे स्टेडियम उभं राहिलं.
दरम्यानच्या काळात एक अपघात झाला, स्टेडियमला आग लागली होती. या सगळ्यातून हे स्टेडियम एका मर्यादित काळात उभं करण्याचं आव्हान मुंबई क्रिकट असोशिएशनच्या पदाधिकार्यांनी स्वीकारून पूर्ण केलं. पन्नास वर्षापूर्वी उभी राहिलेली ही वास्तू आजही ही दिमाखात उभी आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात या स्टेडिममविषयी मोठं प्रेम आणि श्रध्दा आहे, असंही ते म्हणाले.