राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात FIR दाखल, देशाची एकता अन् अखंडता धोक्यात आणल्याचा दावा…
Rahul Gandhi : भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. त्यामुळं आता कॉंग्रेसची लढाई केवळ भाजप आणि संघाशीच नव्हे तर इंडियन स्टेटशीही आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
CM देवेंद्र फडणवीसांचे झ्युरिकमध्ये मराठी बंधू-भगिणींकडून जल्लोषात स्वागत, पाहा फोटो…
राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे हिंदू सेनेनं दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केली होती. या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींवर करावाई करावी, असं या तक्रारीत म्हटलं होतं. दरम्यान, भारतीय दंड संहितेच्या कलम १५२ आणि १९७(१)ड अंतर्गत गुवाहाटी येथील पान बाजार पोलिस ठाण्यात राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आला. भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि अखंडतेला धोक्यात आणणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
FIR नेमकं काय म्हटलंय?
राहुल गांधी यांच्या विधानांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा तक्रारदाराने आरोप केला आहे. मनोज चेतिया यांनी असा दावा केला की गांधींचे शब्द हे राज्याच्या अधिकाराला वैध ठरवण्याचा प्रयत्न होते, ज्यामुळे अशांतता आणि यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते असणाऱ्या व्यक्तीने सार्वजनिक व्यासपीठावरून असं वक्तव्य करणं उचीत नाही. निवडणुकीत जनतेच विश्वास संपादन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर ते आता केंद्र सरकार आणि भारताच्या राज्याविरुद्ध असंतोष भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
VIDEO : MahaKumbh 2025: कुंभमेळाव्यात अग्नितांडव, तासभरात आग आटोक्यात
आपला लढा भारतीय राज्याविरुद्ध असल्याचं घोषित करून राहुल गांधींनी जाणीवपूर्वक विध्वसंक कारवाया आणि लोकांमध्ये बंडखोरी भडकावली आहे. हा राज्याच्या अधिकाराला वैध ठरवण्यचा आणि त्याला एक विरोधी शक्ती म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न आहे, असं चेतिया यांनी एफआयआरमध्ये म्हटलं.
राहुल यांचे विधान म्हणजे निवडणुकीतील निराशा
विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींची लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी आहे. पण त्याऐवजी, त्यांनी भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणारी वक्तव्य करण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर करणे निवडलं, असं एफआयआरमध्ये म्हटलं. लोकशाही मार्गाने लोकांचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरल्याने आरोपी आता केंद्र सरकार आणि भारतीय राज्याविरुद्ध असंतोष भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका पाहता हे चिंताजनक आहे, असंही या एफआयआरमध्ये म्हटलं.