Pankaja Munde On Gauri Palve: मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे (Anant Garaje) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वरळीतील राहत्या घरी अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळाफास घेऊन जीवन संपविले आहे. अनंत गर्जे यांचे एका महिलेशी संबंध होते. त्यातूनच गौरी पालवे-गर्जे (Gauri Palve) हिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांचा आहे. या प्रकरणी अनंत गर्जेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात आता पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांची अधिकृत प्रतिक्रियासमोर आली आहे. (It’s incomprehensible what goes on in someone’s extremely personal life; Pankaja Munde’s emotional reaction to Gauri Garje’s death case)
पीए अनंतचा फोन आला-पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी माध्यमांसाठी प्रेस नोट काढली आहे. त्यात त्या म्हणतात, 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 ते 6.45 वाजण्याच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता . पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती, अशी भावना पंकजा मुंडे यांची आहे.
मी घाबरलो अन् फ्लॅटमध्ये प्रवेश…, डॉ. गौरी प्रकरणात नव वळण? अनंत गर्जेंचा मोठा खुलासा
पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये
पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे. तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजू शकते. अश्या घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
