Download App

विरोधी पक्षनेते राहुल गांधी अलिगडला पोहचले; हाथरस सत्संग चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबाची घेतली भेट

हाथर येथील सत्संग या धार्मिक कार्यक्रमात चेंगराचंगरी सुमारे १२१ लोकांचा मृत्यू झाला. तिथे मृतांच्या कुटुंबाला राहुल गांधींनी भेट दिली.

Rahul Gandhi Hathras Visit : राहुल गांधी  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज सकाळी अलिगडला पोहोचले आहेत. राहुल गांधी यांनी अलिगढमधील हातरस सत्संगमध्ये (Satsang) घडलेल्या चेंगराचेंगरीत जे लोक मृत पावले त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हातरस घटनेत अक्रााबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हातरसच्या (Hathras ) ग्रीन पार्क विभव नगरला जाऊन राहुल गांधींनी (Rahul Gandhi) हातरस जिल्हा रुग्णालयालाही भेट दिली. तिथे त्यांनी जखमींची भेट घेतली. हातरस येथील फलराई गावात मंगळवारी सूरज पाल उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विशेष तपास पथकही आज आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अहवालात 100 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

मुकेश अंबानी पोहोचले राहुल गांधींच्या घरी, सोनिया गांधींचीही घेतली भेट, कारण काय?

हाथरसमधील पुलराई गावामतील सत्संग कार्यक्रमासाठी हजारो भाविक जमले होते. कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडताना मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये सुमारे १२१ लोकांचा मृत्यू झाला. तर १५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. भोले बाबा नावाच्या व्यक्ती सत्संगामध्ये संबोधन करत होता. या अपघातात भारतीय लष्करातील निवृत्त सुभेदार राम नरेश यांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती देताना त्यांच्या मुलगा मनमोहन कुमार म्हणाले, “लोक मरत असताना बाबा भोले पळून गेले.

काय कारवाई होणार?, हाथरस सत्संग दुर्घटनेचा तपास अहवाल ‘SIT’ आज सरकारकडे सुपुर्द करणार

दोन लाखांहून अधिक नागरिक मंडपात उपस्थित होते. भोलेबाबा दुपारी साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल झाले. एक तास हा कार्यक्रम सुरू होता. दुपारी १.४० च्या सुमारास बाबा मंडपातून बाहेर येऊन इटावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडे जात होते. त्याच वेळी भाविक त्यांच्या दिशेने पळाले. तसंच, बाबा जात असलेली जमिनीवरील माती माथ्याला लावण्यासाठी पळापळ करू लागले असे अहवालात नमूद केले आहे.

follow us