दूधाला हमीभाव देण्याबाबत सरकार सकारात्मक, विखे पिता-पुत्रांना अमित शाहांचे आश्वासन

दूधाला हमीभाव देण्याबाबत सरकार सकारात्मक, विखे पिता-पुत्रांना अमित शाहांचे आश्वासन

अहमदनगर – ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे दूध उत्पाद (Milk producer) शेतकऱ्यांनाही हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटी (Radhakrishna Vikhe Patil) यांना दिली.

हाथरस प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, 2 महिलांसह बाबांच्या 6 साथीदारांना अटक 

दुधाच्या दरावरून राज्यातील शेतकरी आक्रमक झाल्यानं मंत्री विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दुध उत्पादकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत दुध उत्पादकांना दिलासा देण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्यानंतर आज मंत्री विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत विखेंनी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शाह यांचे लक्ष वेधले.

हाथरस घटना; भोले बाबांचे 6 निकटवर्तीय जेरबंद… 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. दूध उत्पादन व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. दूधाला हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी चर्चा मंत्री विखेंनी शाह यांच्याशी केली.

दरम्यान, दूध दरामध्ये होणारी चढ-उतार लक्षात घेवून हमीभाव देण्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार निश्चित याबाबात सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही शाह यांनी दिली.

यावेळी मंत्री विखे पाटील यांनी आजपर्यत महायुती सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहितीही शाह यांना दिली.

राज्य सरकारकडून पाच रुपये अनुदान…
राज्य सरकारने सद्य परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता मंत्री विखे पाटील यांनी दोन दिवसांपुर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच सहकारी व खासगी दूध संघाच्या प्रतिनिधीची बैठक घेवून दुधाला ३० रुपये स्थायीभाव व ५ रुपये शासकीय अनुदान असा ३५ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube