Download App

27 ओबीसी, 15 एसटी अन्… कसं आहे मोदींचं मंत्रिमंडळ? एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण समीकरण

PM Modi Cabinet : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी

PM Modi Cabinet : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आज (रविवारी 09 जून) 71 मंत्र्यांनी शपथ घेतली. यापैकी 30 कॅबिनेट तर 36 जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

यावेळी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात (PM Modi Cabinet) देशातील 24 राज्यांना प्रतिनिधित्व मिळाला असून नवीन मंत्री मंडळात 27 ओबीसी, 15 एससी/एसटी तर अल्पसंख्याक समाजातील 5 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच एनडीएमधील (NDA) 11 घटक पक्षांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. तर निर्मला सीतारामन, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांनी सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली आहे.

याच बरोबर शिवराज सिंह चौहान, एचडी कुमारस्वामी, जीतन राम मांझी आणि मनोहर लाल खट्टर यांच्यासह अनेक माजी मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदींच्या नवीन मंत्री मंडळात स्थान देण्यात आले आहे. सहा वेळा ओडिशाचे खासदार आणि लोकप्रिय आदिवासी चेहरा जुआल ओरम यांनीही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. झारखंडच्या ओबीसी नेत्या अन्नपूर्णा देवी यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळाल्याने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली होती. यानंतर आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी एनडीएचे सर्व घटक पक्षातील नेते उपस्थित होते.

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयलसह ‘या’ खासदारांनी घेतली शपथ

लोकसभा निवडणुकीत भाजपला 240, काँग्रेसला 99, समाजवादी पक्षाला 36, टीडीपीला 15, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला 12, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 07 जागांवर विजय मिळाला आहे. तर इंडिया आघाडीला 240 जागा मिळाले आहे. यामध्ये काँग्रेसला 99, समाजवादी पक्षाला 36 जागा मिळाले आहे तर ठाकरे गटाला 10 तर शरद पवार गटाला 07 जागा मिळाले आहे.

5000 कोटींचा मालक असणारा खासदार झाला मोदी सरकारमध्ये मंत्री! चंद्रबाबू नायडूशी आहे खास संबंध

follow us