5000 कोटींचा मालक असणारा खासदार झाला मोदी सरकारमध्ये मंत्री! चंद्रबाबू नायडूशी आहे खास संबंध

5000 कोटींचा मालक असणारा खासदार झाला मोदी सरकारमध्ये मंत्री! चंद्रबाबू नायडूशी आहे खास संबंध

Chandra Sekhar Pemmasani : आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (PM Modi Oath) यांनी शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह आज टीडीपी (TDP) नेते आणि लोकसभा 2024 चे सर्वात श्रीमंत लोकसभा खासदार चंद्रशेखर पेम्मासानी (Chandra Sekhar Pemmasani) यांनी देखील राज्यमंत्री म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

पेम्मासानी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघात वायएसआरसीपीचे किलारी वेंकट रोसैया यांचा तब्बल साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यांनी गुंटूर लोकसभा मतदारसंघातून 344,695 मतांनी निवडणूक जिंकली होती.

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 5705 कोटी रुपये आहे. पेम्मासानी यांनी 1993-94 शैक्षणिक वर्षासाठी EAMCET परीक्षेत 27 वी रँक मिळवून हैदराबादमधील उस्मानिया मेडिकल कॉलेजमध्ये (Osmania Medical College) प्रवेश मिळवला होता. त्यानंतर, 2005 मध्ये, त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील गेसिंजर मेडिकल सेंटरमधून इंटर्नल मेडिसिनमध्ये एमडी पदवी प्राप्त केली.

Uworld चे संस्थापक

लोकसभा खासदार चंद्रशेखर पेम्मासानी Uworld चे संस्थापक आणि CEO आहेत. Uworld एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करते त्यांना ही Uworld मदत करते. माहितीनुसार, टीडीपी नेते आणि लोकसभा 2024 चे सर्वात श्रीमंत लोकसभा खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांनी भारत आणि यूएसमधील 100 हुन अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची एकूण मालमत्ता पाच हजार कोटींपेक्षा जास्त असून त्यांच्याकडे दोन मर्सिडीज कार, एक टेस्ला आणि एक रोल्स रॉयस सारख्या कार्स आहे.

मोहोळ यांचे नाव कन्फर्म : मोदींनी बोलावलेल्या नियोजित मंत्र्यांच्या बैठकीत दिसले

लोकसभा निवडणुकीत टीडीपी पक्षाला 16 जागांवर विजय मिळाला असून आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात टीडीपीच्या 2 खासदारांनी शपथ घेतली आहे. तर भाजपला या लोकसभा निवडणुकीत 240 जागांवर विजय मिळवला होता आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला 12 जागांवर विजय मिळवला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 जागांवर विजय मिळवला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube