नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात किती कॅबिनेट मंत्री ! घटक पक्षांना किती मंत्रिपदे ? यादी पाहा

  • Written By: Published:
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात किती कॅबिनेट मंत्री ! घटक पक्षांना किती मंत्रिपदे ? यादी पाहा

Narendra Modi Oath Ceremony : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज देशात एनडीएचं (PM Narendra Modi Oath) सरकार अस्तित्वात आले. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्या वेळेस देशाच्या पंतप्रधापदाची शपथ घेतली. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

मोदी यांच्या मंत्रिमंडळात 31 कॅबिनेट मंत्री असणार आहेत. त्यात 25 कॅबिनेट मंत्री भाजपचे (BJP) आहेत. तर पाच मंत्री हे घटकपक्षांचे आहेत. तर टीडीपीचा (TDP) एक खासदार, बिहारमधील हम, एलजेपीचे चिराग पासवान, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या सात जागा असून, एक राज्यमंत्रीपद मिळाले आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

NDA Cabinet : राजनाथ सिंह, अमित शाहांनतर ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मागील सरकारमधील काही केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ देण्यात आले आहे. मागील सरकारमधील गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री राहिलेल्या निर्मला सीतारमन यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा हे आता केंद्रात आले असून, ते कॅबिनेटमंत्री असणार आहेत. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, बिहारचे माजी मुख्यमंत्री हम पक्षाचे जीतन राम मांझी हे कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

कॅबिनेट मंत्र्यांची यादी
अमित शाह
राजनाथ सिंह
नितीन गडकरी
जेपी नड्डा
निर्मला सीतारमन
शिवराज सिंह चौहान
डॉ. सुब्रम्हण्यम जयशंकर
मनोहरलाल खट्टर (माजी मुख्यमंत्री, हरियाणा)
एचडी कुमारस्वामी-जेडीएस (कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री)
पियूष गोयल
धर्मेंद्र प्रधान
जीतन राम मांझी-बिहारचे माजी मुख्यमंत्री (हम, बिहारममधील गया मतदारसंघातून विजयी)
राजीव रंजन सिंह (बिहार, जेडीयू)
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्रकुमार
राम मोहन नायडू (टीडीपी)
प्रल्हाद जोशी-भाजप
गिरीराज सिंह-
अश्विनी वैष्णव-
जुएल ओराम-
ज्योतिरादित्य सिंधिया-
भुपेंद्र यादव
गजेंद्रसिंग शेखावत
अन्नापूर्णा देवी
किरेन रिजीजू
हरदीपसिंग पुरी
मनसूख मांडविय
गंगापूरम किसन रेड्डी –
चिराग पासवान -(एलजेपी-बिहार)
सी. आर. पाटील-

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज