Download App

लग्नसराईमुळे भारतीय इकॉनॉमीची भरभराट होणार; 2 महिन्यांत 48 लाख विवाह अन् 6 लाख कोटींचा व्यवसाय अपेक्षित

48 Lakh Wedding In Next Two Months In India : भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) पुन्हा एकदा भरभराट होणार आहे. दिवाळीनंतर आता लग्नसराईचा हंगाम सुरू होतोय. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये 48 लाख विवाहसोहळ्यांमधून 6 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. लग्नसराईमुळे (Wedding) ऑटोमोबाईल्स, वस्तू कपडे, दागिने, भेटवस्तू आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढते.

येत्या दोन महिन्यांत भारतात 48 लाख विवाह होतील, अशी अपेक्षा आहे. या व्यवसायात 6 लाख कोटींची कमाई होऊ शकते, असं CAIT चा अहवाल सांगत आहे. देशात जसजशी लग्नसराई जवळ येत (CAIT Reports) आहे, तसं व्यापारीवर्ग आर्थिक भरभराटीची तयारी करत आहेत. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने अंदाज व्यक्त केलाय की, या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये देशभरात तब्बल 48 लाख विवाहसोहळे होतील. CAIT च्या मते, या विवाहसोहळ्यांमधून ₹6 लाख कोटींचा व्यवसाय होणं अपेक्षित आहे.

महायुतीत किती ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत? शिंदे – फडणवीसांमध्ये 4 तास खलबतं, आज होणार फैसला

विशेष म्हणजे एकट्या दिल्लीत अंदाजे 4.5 लाख विवाह अपेक्षित आहेत.ते स्थानिक अर्थव्यवस्थेत सुमारे ₹1.5 लाख कोटींचे योगदान देतात.12 नोव्हेंबर 2024 पासून लग्नाचा हंगाम सुरू होतोय. संपूर्ण भारतातील किरकोळ विक्रेते उल्लेखनीय आर्थिक उन्नतीसाठी तयारी करत आहेत.CAIT च्या अलीकडील अभ्यासात असं दिसून आलंय की, किरकोळ क्षेत्र, ज्यामध्ये वस्तू आणि सेवा दोन्ही समाविष्ट आहेत. या लग्न सराईच्या काळात एकूण ₹5.9 लाख कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

आज राज्यभरात बंडखोरांची मनधरणी; 3 वाजेपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत, कोणत्या पक्षात काय स्थिती?

या ट्रेंडच्या अनुषंगाने सेन्को गोल्डचे एमडी आणि सीईओ सुवांकर सेन यांनी धनत्रयोदशीदरम्यान लग्नाशी संबंधित सोन्याच्या खरेदीत वाढ झाल्याचं सांगितलं. नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत अनेक ग्राहक लग्नाच्या सिझनठी तयारी करत असल्याचं त्यांनी नमूद केलंय.CNBC TV-18 ला दिलेल्या मुलाखतीत, सेन यांनी स्पष्ट केलं की ऑगस्टमध्ये शुल्क कपातीमुळे ग्राहक खरेदीकडे वळले. परिणामी स्टोअरमध्ये वाढ झाली आणि लग्नाच्या हंगामाची खरेदी सुरू झाली. येत्या दोन महिन्यांत देशात 48 लाख विवाह होणार असून 6 लाख कोटींचा व्यवसाय अपेक्षित आहे.

 

follow us