Pay Commission DA Hike : देशभरातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक गुड न्यूजची वाट पाहत आहेत. ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. दरम्यान, पुढील महिन्यात डीए वाढीची घोषणा होऊ शकते, (Commission) अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. केवळ डीएच नाही तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांची थकबाकीही मिळू शकते.
Share Market : भारतीय शेअर बाजारांची घसरणीसह सुरुवात; आयटी शेअर्स मोठ्या प्रमामत कोसळले
डीएमध्ये किती वाढ?
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत घोषणा होणं बाकी आहे. केंद्र सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता सुधारित करतं. त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. या वाढीमुळे एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळेल. यावेळी केंद्र सरकार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करू शकते, असं मानलं जात आहे.
महागाई भत्ता 53 टक्क्यांपर्यंत
केंद्र सरकार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करू शकते. डीएमध्ये 3 टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची वाढ 53 टक्क्यांवर पोहोचेल. 1 जुलै 2024 पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीतील वाढ लागू होण्याची शक्यता आहे. याला विलंब होत असला तरी, वाढलेले दर 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून लागू होणार असल्याचं मानलं जात आहे.
खेळाडूंवर पैशांचा पाऊस! BCCI निर्णयाच्या तयारीत; पगारवाढीचा प्लॅन अंतिम टप्प्यात
पगार किती वाढणार?
डीएमध्ये 3 टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 53 टक्क्यांवर पोहोचेल. आता उदाहरणासह पगारवाढ समजून घेऊ. जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 30,000 रुपये असेल, तर सध्या 50 टक्के डीएनुसार त्याला 15,000 रुपये महागाई भत्ता मिळतो. तसंच, जर महागाई भत्ता 53% पर्यंत वाढला तर त्याच्या पगारातील DA 16900 रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा एकूण 900 रुपयांची वाढ होणार आहे. डीएसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांचं इतर भत्तेही वाढणार आहेत. त्याचाही लाभ मिळणार आहे.