सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट! महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ…
Increase in inflation allowance : आगामी लोकसभा निवडणुकीआधीच सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करण्यात आलं आहे. एक मोठं गिफ्ट सरकारकडून देण्यात आलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारकांच्या महागाई भत्त्यात (Increase in inflation allowance) 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केरळनं मारली बाजी; भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म ‘C Space’ लॉन्च
महागाई भत्ता आणि सवलतीत वाढ करण्याचा हा निर्णय यावर्षी १ जानेवारीपासून लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ४९.१८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७.९५ लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे. या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झाल्याने, महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 50 टक्के होईल आणि यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा गृहनिर्माण भत्ता आणि ग्रॅच्युइटीही वाढेल. वेगवेगळ्या विभागांना त्यांच्या पगारानुसार त्याचे फायदे मिळतील.
मंत्री पियूष गोयल म्हणाले, केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आता २० लाखांवरून २५ लाखांपर्यंत वाढणार आहे. सध्या ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपये आहे. महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत केवळ चार टक्के वाढ केल्यास सरकारवर वार्षिक 12,868.72 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडेल. परंतु इतर प्रकारच्या भत्त्यांमध्ये वाढ झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना या वर्षी जानेवारी ते पुढील वर्षी फेब्रुवारीदरम्यान 9,400 कोटी रुपयांचा वेगळा लाभ मिळणार आहे.
डीएमध्ये वाढीसोबतच वाहतूक भत्ता, कॅन्टीन भत्ता आणि प्रतिनियुक्ती भत्त्यासह इतर भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. घरभाडे भत्ता मूळ वेतनाच्या 27 टक्के, 19 टक्के आणि 9 टक्के वरून अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के करण्यात आला आहे. ग्रॅच्युइटी अंतर्गत लाभ सध्याच्या 20 लाख रुपयांवरून 25 टक्क्यांनी वाढवून 25 लाख रुपये करण्यात आला आहे.