केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ

Untitled Design   2023 03 25T072808.104

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Staff) आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) आता एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (Inflation allowance) मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा आता चार टक्कांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.

काल पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात बंपर पगार येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील तब्बल एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. दर वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करते जेणेकरून त्यांना महागाईपासून दिलासा मिळू शकेल.
राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; ‘डरो मत’ देशव्यापी आंदोलनाची घोषणा

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता सध्याच्या ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. महागाई भत्त्या सोबतच केंद्रीय नोकरदरांना आणि पेन्शनधारकांना एरिअर देखील मिळणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मिळणाऱ्या महागाई भत्तामध्ये वाढ केल्यानंतर आता केंद्र सरकारच्या तिजोरीवर तब्बल वार्षिक 12,815.60 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. एका रिपोर्टनुसार, या निर्णयाचा फायदा 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. महागाई भत्यात करण्यात आलेली वाढ ही 7 व्या वेतन आयोगच्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे.

DA किती वाढणार?
महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. उदाहरणार्थ, समजा जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 25 हजार 500 रुपये असेल. तर 38 टक्के डीएनुसार सध्या 9 हजार 690 रुपये मिळतात. डीए 42 टक्के झाल्यास, महागाई भत्ता हा 10 हजार 710 रुपये होईल. म्हणजे दर महिन्याला पगारात 1 हजार 20 रुपयांना वाढ होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube