Download App

PDP candidates List : मेहबूबा मुफ्तींच्या मुलीची राजकारणात एंट्री, बिजबेहरामधून विधानसभा लढणार

मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती बिजबेहारा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

  • Written By: Last Updated:

8 PDP candidates announced : अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) जम्मू-काश्मीर विधानसभेच्या (Jammu and Kashmir Vidhansabha Election) निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. दरम्यान, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनीही त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती (Iltija Mufti) यांच्या नावाचाही समावेश आहे. इल्तिजा ह्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बिजबेहरा येथून निवडणूक लढणार आहेत.

मोठी बातमी! CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची तब्येत बिघडली, एम्समध्ये दाखल 

मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती बिजबेहारा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) सोमवारी जाहीर केलेल्या आठ उमेदवारांच्या यादीत इल्तिजा यांचे नाव आहे. तर अनंतनाग पूर्वमधून ज्येष्ठ नेते अब्दुल रहमान वीरी आणि देवरसमधून मुफ्ती यांचे काका सरताज अहमद मदनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पीडीपीच्या 8 उमेदवारांची नावे जाहीर
अनंतनाग पूर्व – अब्दुल रहमान वीरी
देवसर – सरताज अहमद मदनी
अनंतनाग – डॉ.मेहबूब बेग
चरार-ए-शरीफ – नबी लोन हंजुरा
बिजबेहरा – इल्तिजा मुफ्ती
वाची- जी मोहिउद्दीन वाणी
पुलवामा – वाहीद-उर-रहमान पारा
त्राल – रफिक अहमद नाईक
पीडीपीचे सरचिटणीस गुलाम नबी लोन हंजुरा यांनी ही यादी जाहीर केली आहे.

WhatsApp कॉल करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता कॉलिंगसाठी होणार मोठा बदल 

दरम्यान, मेहबुबा मुफ्ती यांनी यंदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला असून आता त्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत, असं वृत्त आहे.

कोण आहे इल्तिजा मुफ्ती?

मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती आगामी विधानसभा निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात करणार आहेत. इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. याशिवाय, युनायटेड किंगडमच्या वरविक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. इल्तिजा यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे.त्या बऱ्याच काळापासून पक्षप्रमुखांच्या माध्यम सल्लागार म्हणून काम करत आहेत.

follow us