Download App

उत्तरप्रदेशमधील भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

Fatehpur Big Accident : उत्तर प्रदेशमधील (UP)फतेहपूर (Fatehpur)जिल्ह्यात आज एक भीषण अपघात (terrible accident)झाला आहे. या अपघातात ऑटोमधील आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यामध्ये दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. जहानाबादमधील मिरची मोडजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या वेळी ऑटोमध्ये 14 जण होते. घटनास्थळी ये-जा करणाऱ्यांची गर्दी जमली. एकाच वेळी आठ मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला.

नितीन गडकरी कोणाला नकोसे? तिसऱ्यांदा आला धमकीचा फोन

जेहानाबाद, फतेहपूर येथील चिल्ला मोडजवळ एका भरधाव टँकरने ऑटोला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर टँकर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. सध्या घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत.

मिळालेली माहिती अशी की, घाटमपूरहून ऑटो येत होता. ऑटोमध्ये जवळपास 14 जण होते. तेव्हा समोरुन येणाऱ्या टँकरने ऑटोला धडक दिली. या अपघातात महिला-पुरुष आणि लहान मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर घटनास्थळी मोठा राडा झाला. घटनास्थळावरून जखमींना उचलण्यासाठी आजूबाजूचे लोक आणि रस्त्यावरुन जाणाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवले. यासोबतच मृत लोकांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. ही धडक इतकी जोरदार होती की, ऑटोमधील सर्वच जण रस्त्यावर फेकले गेले. टँकर पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज