नितीन गडकरी कोणाला नकोसे? तिसऱ्यांदा आला धमकीचा फोन

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T164650.231

NItin Gadakari Threat Call :  भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे. याआधी देखील त्यांना धमकीचे फोन आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांना हा धमकीचा फोन आला आहे. फोन करणाऱ्याने सांगितले की मला केंद्रीय मंत्र्याशी बोलायचे आहे आणि त्यांना धमकी दिली. या प्रकरणी पोलिस  सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

काल संध्याकाळची ही घटना आहे. काल संध्याकाळी नितीन गडकरींच्या कार्यालयामध्ये हा धमकीचा फोन आला होता. त्यांच्या सहकाऱ्याने हा फोन उचलला होता. मला मंत्र्यांशी बोलायचे आहे असे सदरील व्यक्तीने सांगितले. यानंतर मंत्री कामात आहे, असे उत्तर त्याला देण्यात आले. यावर त्या व्यक्तीने धमकी दिली आहे. आता या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेनंतर गडकरींच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांकडे याची तक्रार दिली आहे.

दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या कॉलची माहिती मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेतील तपशिलांची पडताळणी केली जात असून, तपास सुरू आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Google सर्च केलं : पत्नी, मुलीची हत्या करत बड्या अधिकाऱ्याची आत्महत्या

दरम्यान,  याआधी देखील गडकरींना धमकीचा फोन आला होता. यानंतर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारीला अटक केली असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याची कसून चौकशी केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून जयेश पुजारी हा वेगवेगळ्या तुरुंगामध्ये आहे. त्यामुळे त्याला जेलमध्ये कोणी मदत करत होते का याचा तपास पोलिस करत आहेत. जेलमधून तो आपल्या कुटूंबाला व्हिडीओ कॉल व व्हॉईस कॉल देखील करत असल्याची पोलिसांची माहिती आहे.

 

Tags

follow us