Unnao Accident : बस आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. (UP) मिळालेल्या माहितीनुसार उन्नाव जिल्ह्यात लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बिहारमधील शिवगढहून दिल्लीकडे जाणाऱ्या स्लीपर बसची एका टँकरला धडक बसली त्यामध्ये हा अपघात झाला. ही धडक एवढी जोरदार होती की, बस आणि टँकरचा चक्काचूर झाला. (Accident) या अपघातात दोन महिला आणि एका बालकासह 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचबरोबर सुमारे 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मदतकार्य करत मृतांसह जखमींना बाहेर काढल आहे. त्यातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.
पहाटेची घटना माणुसकीला काळिमा फासणारी घटना; जमिनीच्या वादातून भावाने अंगावर डिझेल ओतून वृद्धाला जाळलं
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बेहता मुजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या दुधाच्या टँकरला पहाटे 05:15 च्या सुमारास धडकली. त्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमाऊ येथे उपचारासाठी दाखल केलं. बेहता मुजावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
दरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव जिल्ह्यातील रस्ता अपघाताची दखल घेतली आहे आणि मृतांच्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाहतूक ठप्प मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठकीवरून विधानसभेत गदारोळ; आमदार साटमांसह शेलारही आक्रमक
किटांच्या आधारे मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त बस आणि टँकर रस्त्यावर उलटल्याने आग्राच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी सुमारे दोन किलोमीटर लांब जाम जाम झाला होता.
उन्नाव जिल्ह्यात लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. बिहारमधील शिवगढहून दिल्लीकडे जाणाऱ्या स्लीपर बसची एका टँकरला धडक बसली. यामध्ये 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.#UnnaoAccident #LucknowAgraExpressway pic.twitter.com/GZ1MvHygNZ
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 10, 2024