माणुसकीला काळिमा फासणारी घटना; जमिनीच्या वादातून भावाने अंगावर डिझेल ओतून वृद्धाला जाळलं
Nashik News : नाशिक जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जमिनीच्या मालकीवरुन सुरु असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे एका वृ्द्ध व्यक्तीला जाळण्यात आलंय. (Crime) निफाड तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. (Nashik ) येथील थडी सारोळे गावातील कचेश्वर नागरे (वय 80) यांच्या अंगावर सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनीच डिझेल टाकून त्यांना पेटवून दिलं. यामध्ये कचेश्वर नागरे 95 टक्के भाजले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरे कुटुंबियांनी घेतली आहे.
पेटवून देऊन पळाले मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठकीवरून विधानसभेत गदारोळ; आमदार साटमांसह शेलारही आक्रमक
गेल्या सात-आठ वर्षांपासून थडी सरोळे गावात नांदूर मध्यमेश्वर चांगदेव महादू नगरे आणि कचेश्वर महादू नागरे यांच्यात शेतीचा वाद सुरु होता. मात्र, माझे वडील कचेश्वर महादू नांगरे आणि आई जिजाबाई नांगरे वयोवृद्ध असून एकटेच राहत होते. माझा भाऊ शेजारी राहत होता. पण, तो कामासाठी बाहेर गेला होता. याचाच फायदा घेत माझ्या वडिलांवर डिझेल फेकून पेटवून देत तिकडून पळ काढला, असं मृत कचेश्वर नगरे यांचा मुलगा संजय नागरे यांनी सांगितलं.
नेमका वाद काय? ब्रेकिंग ! वरळी हिट अँड रनप्रकरणात शिंदेंचा मोठा निर्णय; राजेश शाहांची गच्छंती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरे बंधूंमध्ये शेतामधील वडिलोपार्जित विहिरीवरुन वाद आहे. कचेश्वर नागरे हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करत होते. ते घरात एकटे होते. हीच संधी साधून त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नगरे आणि भावजई आणि पुतण्यांनी कचेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले. आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कचेश्वर नागरे वाचण्यासाठी सैरभैर पळायला लागले. त्यांचा आवाज ऐकून कचेश्वर नागरे यांचे कुटुंबीय धावत बाहेर आले. तोपर्यंत चांगदेव नागरे आणि त्याचे कुटुंब तिथून पसार झाले होते. यानंतर कचेश्वर नागरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 95 टक्के भाजल्यामुळे कचेश्वर नागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला