Rape at IIM Kolkata Campus : पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपुर्वी तेथील लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला होता. (Rape) आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील आयआयएम या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेत एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाला आहे.
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएमच्या वसतीगृहात एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाला आहे. ही घटना शुक्रवारी (11 जुलै) घडली असून पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाला, ती आयआयएमची विद्यार्थिनी नाही.
मोठी बातमी! कोलकाता रेप प्रकरणातील आरोपी संजय रॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अत्याचाराचे प्रकरण घडल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने हरिदेवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दाखल तक्रारीनुसार आयआयएमच्या संकुलात गेल्यानंतर तिची प्रवेशद्वारावर नोंद घेण्यात आली नाही. ती हॉस्टेलमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत थांबली होती. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दाखल तक्रारीनुसार इन्टर्नशीप आणि काऊन्सलिंगसाठी तिला मुलांच्या वसतीगृहात बोलावण्यात आले होते. त्यानंतर पीडित विद्यार्थिनी मुलांच्या वसतीगृहात गेली. तिथे तिने आरोपी विद्यार्थ्याच्या खोलीत प्रवेश केला.
त्यानंतर आरोपीने पिझ्झा आणि कोल्ड ड्रिंक ऑर्डर केले. आरोपीने तिला थोडा वेळ वाट पाहण्यास सांगितले आणि खोलीतून बाहेर निघून गेला. मधल्या वेळेत तिने तिथे पिझ्झा खाल्ला आणि तिथेच बेशुद्धावस्थेत पडली. शुद्धीवर आल्यानंतर माझ्यावर बलात्कार झाल्याचे तिला समजले. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. संध्याकाळी उशिरा एका विद्यार्थिनीने हरीदेवपूर पोलीस ठाण्यात एका विद्यार्थिनीने तक्रार दिली होती.
आयआयएम परिसरात माझ्यावर बलात्कार झाला आहे, असे तिने या तक्रारीत म्हटले आहे. दिलेल्या तक्रारीनुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, असे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, याआधीही पश्चिम बंगालमधील कस्बा लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. त्यानंतरही पश्चिम बंगालसह देशभरात खळबळ उडाली होती.