SBI Duplicate Branch : छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. (SBI) एका गावात एसबीआयची डुप्लीकेट शाखा सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट बँकेच्या शाखेच्या माध्यमातून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणातील आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अनेकांना नोकऱ्या दिल्या
या बनावट बँकेच्या शाखेच्या माध्यमातून लाखो रुपये घेऊन अनेकांना नोकऱ्या दिल्या होत्या. मनोज अग्रवाल नावाची व्यक्ती अर्ज करण्यासाठी आली तेव्हा ही घटना उघडकीस आली. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. कोरबा व कावर्धा येथील अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
सावधपणे आखली योजना
या घटनेतील गुन्हेगारांनी अत्यंत सावधपणे योजना आखून अनेकांची फसवणूक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची बनावट शाखा तयार केली. या घोटाळ्यामध्ये बेकायदेशीर नियुक्ती, बनावट प्रशिक्षण सत्रे, बेरोजगार व्यक्ती आणि स्थानिक ग्रामस्थांची फसवणूक करण्यासाठी विस्तृत सेटअप तयार करण्यात आले होते.