Download App

आसाराम यांच्या पत्नी आणि मुलीलाही भोगावा लागणार तुरूंगवास? गुजरात उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

Aasaram Bapu Case 2013 : स्वतः ला आध्यत्मिक गुरू म्हणून घेणारे आणि प्रचंड शिष्यवर्ग असणाऱ्या बाबा आसारामला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी 2013 साली गुजरात उच्च न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. त्यामध्ये आता आसाराम यांची पत्नी, मुलगी आणि तीन महिला शिष्यांना नोटिस बजावली आहे. मात्र या अगोदर त्यांची मुक्तता करण्यात आली होती. ( Aasarams wife and daughter issue notice frome Gujrat High Court in Aasaram Bapu Case 2013 )

Madhuri Pawar: लग्नासाठी कसा मुलगा हवा? माधुरी पवारने वाचला अटींचा पाढा, म्हणाली “मला …

न्यायालायामध्ये दाखाल करण्यात आलेल्या अपिलवर 29 दिवस उशीराने बचावपक्षाला म्हणजे आसाराम यांची पत्नी, मुलगी आणि तीन महिला शिष्यांना नोटिस बजावली आहे. यामध्ये न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यामूर्ती हसमुख सुथार यांच्या विभागीय बेंचने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

केसीआर पंकजा मुंडे यांना फोन करणार? बीआरएस नेत्याने स्पष्टच सांगितलं…

काय आहे बाबा आसाराम प्रकरण?

स्वतः ला आध्यत्मिक गुरू म्हणून घेणारे आणि प्रचंड शिष्यवर्ग असणाऱ्या बाबा आसाराम हा त्याच्या अहमदाबाद जवळील मोटेरा येथील आश्रमामध्ये 2001 ते 2007 या काळामध्ये अनेक वेळा महिलांवर अत्याचार करत होता. त्यावर 2013 साली गुजरात उच्च न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. त्यानंतर तो जोधपूर येथील एका प्रकरणात देखील शिक्षा भोगत आहे. मात्र यामध्ये आसाराम यांची पत्नी, मुलगी आणि तीन महिला शिष्यांची मुक्तता करण्यात आली होती.

त्यानंतर गुजरातमधील कायदेविभागाने आसाराम यांची पत्नी, मुलगी आणि तीन महिला शिष्यांसह मुक्तता करण्यात आलेल्यांच्या विरोधात अपिल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 6 पैकी 5 जणांविरोधात अपिल दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता आसाराम प्रमाणेच आसाराम यांची पत्नी, मुलगी आणि तीन महिला शिष्य यांना देखील शिक्षा होणार का? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

Tags

follow us