Madhuri Pawar: लग्नासाठी कसा मुलगा हवा? माधुरी पवारने वाचला अटींचा पाढा, म्हणाली “मला …

Madhuri Pawar: लग्नासाठी कसा मुलगा हवा? माधुरी पवारने वाचला अटींचा पाढा, म्हणाली “मला …

Madhuri Pawar: एकच वार माधुरी पवार (Madhuri Pawar) अशा अप्रतिम डायलॉगने गाजलेली नृत्यांगना आणि उत्तम अभिनेत्रीने आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे, तिने कठीण काळही बघितला आहे. झोपडपट्टीमधील पत्र्याच्या घरात राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण करणारी सध्या अभिनयक्षेत्रामध्ये उत्तम काम करत आहे. तसेच तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माधुरीने तिला लग्नासाठी (Marriage) नेमका कसा मुलगा पाहिजे? याविषयी मोठा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Pawar (@madhuripawarofficial)


यावर माधुरी म्हणाली, “मी लग्न करेन की नाही, हा माझ्यासाठी सर्वात मोठा प्रश्न आहे. मला आता तरी लग्न करावं असं वाटत नाही. कारण करिअर आणि घरच्या जबाबदाऱ्या खूप आहेत. या सगळ्यामध्ये मला माझा जोडीदार मिळाला तर त्याला उत्तम मराठी लिहता आणि वाचता आले पाहिजे. कारण माझं माझ्या मराठीवर खूप प्रेम आहे. त्याला महाराष्ट्राचा इतिहास माहीत असला पाहिजे,  छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द त्याला माहीत असली पाहिजे. तसेच तो स्त्रीचा, तिच्या मतांचा आदर करणारा पाहिजे, तो त्याच्या आई-वडिलांचा आदर करणारा असावा. जर तो त्याच्या आई- वडिलांचा आदर करत असेल तरच तो माझ्या आई-वडिलांचा आदर करू शकणार आहे. असे यावेळी अभिनेत्रीने सांगितले आहे.

पुढे माधुरी म्हणाली की, “तो खूप श्रीमंत असावा, प्रचंड पैसा कमावणारा असावा असे काहीच नाही. माझाही साड्या आणि चपला शिवाय फार खर्च नाही. त्यामुळे जेमतेम कमावणारा असला तरी देखील मला चालेल. दिसायला तो खूप सुंदर असावा, असे देखील काही नाही, परंतु  मला सावळी मुलं खूप आवडतात. कारण मी देखील सावळीच आहे. यामुळे मला सावळी किंवा गव्हाळ रंगाची मुलं छान असल्याचे वाटते. कारण त्यांचा स्मार्टनेस खूप अफलातून राहतो. मुलाचे केस चांगले असावेत, माझ्यापेक्षा थोडा उंच असावा आणि आयुष्यभर मी सांगेल ते ऐकणारा पाहिजे. असा मुलाच्या शोधात असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

तसेच माधुरी स्वतःच्या स्वभावाबद्दल भाष्य केली आहे, “मी टॉम बॉयसारखी पण आणि थोडी बालिश आहे, गंभीरही आहे, तसेच परखड मतं मांडणारी आहे. मी कायम स्वतःचाच विचार करते असते, त्यावेळेस मला असं वाटतं की मला सांभाळणं घेणे खूप अवघड आहे. माझ्याशी लग्न करणं ही सर्वात मोठी आयुष्याची रिस्क आहे. अर्थात लग्न केल्यावर तो माझ्यासोबत खूश देखील असणार आहे,” असं माधुरी यावेळी म्हणाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube