केसीआर पंकजा मुंडे यांना फोन करणार? बीआरएस नेत्याने स्पष्टच सांगितलं…
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना फोन करणार असल्याचं बीआरएस नेते बाळासाहेब सानप यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर बीआरएस नेते सानप यांनी भाष्य करताना सडकून टीका केली आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्राची जनता बीआरएसच्या मागे उभी राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मतदार झोपेत असताना डोक्यात दगड घालण्यासारखंचच काम, बीआरएस नेत्याची सडकून टीका…
पुढे बोलताना सानप म्हणाले, पंकजा मुंडे यांनी इच्छा दर्शवल्यास थेट मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना भेटून मुंडेंना फोन करण्याबाबत सांगणार असल्याचं सानप यांनी सांगितलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्यास त्या राज्यातल्या बीआरएस पक्षाच्या बड्या नेत्या होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
राहुलची होणार सुट्टी? टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक, BCCI च्या हालचाली सुरु
तसेच पंकजा मुंडे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या जनतेतील घराघरांत बीआरएस पक्ष पोहोचवण्याचं काम करणार असल्याची ग्वाहीच सानप यांनी दिलीय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केसीआर यांच्या गुलाबी वादळात राज्यातले अनेक दिग्गज नेते सामिल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच केसीआर यांचं गुलाबी वादळ आषाढीनिमित्त पंढरपुरात धडकलं होतं. केसीआर यांच्या पंढरपुर दौऱ्यादरम्यान, अनेक दिग्गज नेत्यांनी बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये विशेषत:
राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके तर भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम, चरण वाघमारे यांनी केसीआर यांचं नेतृत्व मान्य केलंय.
दरम्यान, सध्या बीआरएस पक्षाची मोठी फौज महाराष्ट्रात उभी ठाकली असून यामध्ये माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, बाळासाहेब देशमुख, माणिकराव कदम तसेच हरीश राव यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे आता पंकजा मुंडेही भाजपात नाराज असल्याने मुंडेंही बीआरएसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. कारण बीआरएस प्रवेशाबाबत मुंडेंनी सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.