Download App

मोठी बातमी! एअरटेलचा गरीबांना झटका, 249 रुपयांचा रिचार्ज बंद

Airtel 249 Plan Discontinue : रिलायन्स जिओनंतर आता देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) नेही आपल्या प्रीपेड युजर्सना मोठा झटका दिला आहे. एअरटेलनं 249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करण्याचा (Airtel 249 Plan) निर्णय घेतला आहे. हा प्लॅन कमी किमतीत दररोज डेटा वापरणाऱ्यांसाठी उपयुक्त (Mobile Recharge) मानला जात होता.

Airtel 249 प्लॅनमध्ये काय मिळत होतं?

249 रुपयांच्या प्लॅनसोबत एअरटेल प्रीपेड ग्राहकांना दररोज 1 जीबी हाय-स्पीड डेटा, 100 एसएमएस, आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत होती. त्यासोबतच फ्री एक्स्ट्रीम प्ले, Perplexity Pro AI आणि हेलोट्यूनसारखे (Reliance Jio 249 Plan) फायदेही देण्यात येत होते.

तिरुपतीकडे व्यवसायासाठी प्रार्थना, शेअर्स विकून कमवले 7 हजार कोटी अन् मंदिरात दान केलं 121 किलो सोने

Airtel 249 प्लॅनची वैधता

या प्लॅनसोबत 24 दिवसांची वैधता मिळत होती. विशेष म्हणजे, या प्लॅनसोबत कंपनीने ग्राहकांना जानेवारी 2026 पर्यंत फ्री एआयचा वापर करण्याची सुविधाही दिली होती. पण आता हा प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांना पुढचा महागडा पर्याय घ्यावा लागणार आहे.

डेंग्यू ते मलेरिया… डास पसरवताहेत जीवघेणे आजार, जाणून घ्या डासांंपासून संरक्षणाचे घरगुती उपाय

आता पर्याय – Airtel 299 प्लॅन

249 चा प्लॅन बंद झाल्यानंतर युजर्सना 299 रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागेल. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. त्यासोबत 28 दिवसांची वैधता, स्पॅम अलर्ट, फ्री हेलोट्यून आणि Perplexity Pro AI असे फायदे दिले जातात.

Reliance Jio 249 प्लॅनची माहिती

जिओचा 249 रुपयांचा प्लॅन देखील दररोज 1 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळत होता. त्यात 28 दिवसांची वैधता मिळायची आणि जिओ टीव्हीचा फ्री एक्सेस दिला जायचा. जरी हा प्लॅन जिओच्या अधिकृत वेबसाईटवरून आणि मायजिओ अॅपमधून हटवण्यात आला असला तरी काही ग्राहकांकडे अजूनही हा प्लॅन खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे.

 

follow us