Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी महत्वाचे विधान करत अयोध्येला जाणार की नाही या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आमंत्रण मिळाले असले तरी या सोहळ्याला जाणार नाही, असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले असून तसे पत्र राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पाठवले आहे.
Ram Mandir : 22 जानेवारीला असंख्य भारतीयांसह सरस्वती देवींच्या कुटुंबीयांची ‘ती’ प्रतिक्षा संपणार!
राम मंदिर सोहळ्यासाठी ट्रस्टकडून आमंत्रण मिळाले नसल्याचे अखिलेश यादव यांनी आधी म्हटले होते. आता मात्र आमंत्रण मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्र लिहून सोहळ्यावेळी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद. समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा. या सोहळ्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासह नक्कीच येऊ. मिळालेल्या निमंत्रणासाठी पुन्हा धन्यवाद, असे अखिलेश यादव यांनी या पत्रात म्हटले आहे.
सोहळ्यानंतर अयोध्येला जाणार – शरद पवार
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनीही महत्वाचे विधान केले आहे. अयोध्येतील श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Inauguration) होणार आहे. मला मात्र आमंत्रण मिळालेलं नाही. पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला जाणार नाही. त्यानंतर नक्की जाईन,असे शरद पवार यांनी काल पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सांगितले होते.
राम मंदिर सोहळा, शंकराचार्य अन् विरोध; जाणून घ्या हिंदू धर्मातील महत्त्व