America’s big gift to India! Tariff reduced from 50% to 18%; Modi thanked Trump : गेल्या कित्येक दिवसांपासून जगभरासह भारतावर देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार विविध कारणं देत टॅरिफ वाढवला जात होता. मात्र या दरम्यान आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ कमी करून 18 टक्के पर्यंत आणला आहे. त्यामुळे एकूण 50 टक्के वरून टॅरिफ आता 18 टक्के पर्यंत खाली आला आहे.
अजितदादांच्या विमान अपघातावर भुजबळांचं मोठ वक्तव्य; थेट नाव घेत केला दावा
यापूर्वी रशियन तेल खरेदीमुळे लादलेला अतिरिक्त 25 टक्के दंडात्मक टॅरिफ काढून टाकला गेला आहे. मात्र यासाठी भारताने अमेरिकेला रशियन तेलाची खरेदी थांबवण्याचे (किंवा मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे) वचन दिले आहे. त्याऐवजी भारत अमेरिकेकडून (आणि कदाचित व्हेनेझुएलाकडून) जास्त तेल खरेदी करेल. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत $500 अब्ज पेक्षा जास्त मूल्याच्या अमेरिकन उत्पादने (ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा इ.) खरेदी करण्यास तयार आहे.भारताने अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ बॅरियर्स कमी करण्याचे (काही ठिकाणी शून्य करण्याचे) वचन दिले आहे.
दरम्यान भारताच्या बाजूने US हे सर्वात मोठे व्यापार भागीदार आहे. जी निर्यातीचा 20% भाग हा अमेरिकेसोबत केला जातो. त्यामुळे हा निर्णय भारतासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. त्याचबरोबर US डेटा नुसार दोन्ही देशातील व्यापाराची सध्याची अधिकृत एकूण रक्कम (goods + services, 2024-2025 आधारित): $200-212 अब्ज आहे. तर Goods मात्र: $120-140 अब्ज आहे
पंतप्रधान मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार…
माझे परममित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला. मेड इन इंडिया प्रोडक्ट्सवर आता अमेरिकेने टॅरिफ घटवून 18% केला आहे. त्यामुळे मी एक अब्ज चाळीस कोटी जनतेच्या वतीने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो.
Wonderful to speak with my dear friend President Trump today. Delighted that Made in India products will now have a reduced tariff of 18%. Big thanks to President Trump on behalf of the 1.4 billion people of India for this wonderful announcement.
When two large economies and the…
— Narendra Modi (@narendramodi) February 2, 2026
जेव्हा जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि दोन सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र येतात. तेव्हा जनतेसाठी संधीची अनेक दारं खुली होतात. ज्यामुळे दोन्ही देशांचा लाभ होतो. जागतिक शांतता आणि सुबत्तेसाठी ट्रम्प यांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे.
