Download App

रेड्डींना उमेदवारी म्हणजे नक्षलवादाला पाठिंबा; उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरून शाहंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Amit Shah यांनी युपीएचे उमेदवार रेड्डी यांच्यावरून राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

Amit Shah On resignation of Ex Vice President Jagdeep Dhankhad also Criticize Rahul Gandhi : केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी यावेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमधील उमेदवारांवरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर दिले. तसेच युपीएचे उमेदवार रेड्डी यांच्यावरून राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

काय म्हणाले अमित शाह?

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं पत्र त्यांनी जाहीर केलेलं आहेत. त्यांनी त्यांच्या आरोग्याच्या कारणांसाठी राजीनामा दिली आहे. तसेच त्यांनी निरोप घेतााना सरकार आणि त्यातील मंत्र्यांचे त्यांच्या कार्यकाळ चांगला गेला यासाठी आभार मानले आहेत. तसेच त्यांना यावेळी धनखड सध्या कुठे आहेत? यावर विचारले असता. ते म्हणाले की, विरोधी पक्ष काय म्हणतो? यावर खरं काय आणि खोटं काय हे ठरवलं जात आहे. तसेच वेगवेगळ्या अफवा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणाऱ्या धनखड यांच्या विषयावर अवास्तव ताणून माहिती काढण्याची गरज नाही.

‘नाच मोरा’ गाण्यावर प्रेक्षकांची नजर खिळली! ‘सकाळ तर होऊ द्या’मधून झळकला सुबोध भावेचा नवा अंदाज

तसेच यावेळी विरोधी पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर बोलताना शाह म्हणाले की, राहुल गांधी हे लोकांच्या शेतात आणि इतर ठिकाणी जातात. हे कार्यक्रम नियोजित कलेले असतात. पण त्यामध्ये आणि खरा जनसंपर्क करणे यामध्ये अत्यंत फरक आहे. तसेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून देखील शाह यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे सीपी राधाकृष्णन हे दाक्षिणात्य आहेत. कारण राष्ट्रपती उत्तरेतून आलेल्या असल्याने दक्षिणेला देखील प्रतिनिधित्त्व देण्याची आवश्यकता आहे. तसेच ते संघातून आलेले आहेत. म्हणजे काही कमतरता नाही. वाजपेयींपासून माझ्यापर्यंत अनेक जण संघाच्या संबंधित आहेत.

Video : जगदीप धनखड नजरकैदेत?; राजीनाम्यासाठी दबाव; शाहंच्या उत्तराने सस्पेन्स संपला…

दुसरीकडे युपीएचे उमेदवार रेड्डी यांनी दिलेल्या नक्षलवादाच्या प्रोत्साहनावर राहुल गांधींनी बोलावं. कारण त्यांनी रेड्डी यांना उमेदवारी देऊन डावी विचारसरणी आणि नक्षलवादाला पाठिंबा दिला आहे. असं म्हणत शाह यांनी राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

follow us