Download App

मोदींना अडकविण्यासाठी CBI चा दबाव होता; शहांच्या विधानाने खळबळ !

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमधील बनावट चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. ‘रायझिंग इंडिया समिट 2023’ मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला.

त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कमकुवत केल्याबद्दल काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधला.  2014 आणि 2019 मध्ये आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे आश्वासन दिले होते. भ्रष्टाचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ नये, असे विरोधकांना वाटत आहे का, असा सवाल शहा यांन उपस्थित केला.

ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात कथित बनावट चकमक प्रकरणात पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआय माझ्यावर दबाव आणत होती. असे असतानाही भाजपने कधीही गदारोळ केला नाही.

Satej Patil यांचं महाडिकांना आव्हान : कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा…

‘मी जेव्हा गुजरातचा गृहमंत्री होतो तेव्हा सीबीआयने माझ्यावर चकमकीप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या ९० टक्के प्रश्नांमध्ये मला हेच यायचे, तुम्ही नाराज का होता, नरेंद्र मोदींचे नाव घ्या, तुमचा उद्धार होईल. आम्ही कधी काळे कपडे घालून संसद ठप्प केली नाही. उच्च न्यायालयाने मला ९० दिवसांत जामीन दिला. मला अटक करण्यासाठी सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते.

हे प्रकरण गुजरातबाहेर मुंबई उच्च न्यायालयात नेण्यात आले. सीबीआयने राजकीय सूडबुद्धीने राजकीय इशाऱ्यावर हा गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे अमित शहा यांच्यावर दाखल करण्यात आलेला खटला आणि सर्व आरोप फेटाळून लावत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते असे त्यांनी नेटवर्क 18 वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले.

शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याप्रकरणी खंडपीठाची सरकारला नोटीस

राहुल गांधींवर कारवाई म्हणजे लोकशाही धोक्यात का ?

राहुल गांधींना सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्याबद्दल, गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, राहुल गांधी हे एकमेव व्यक्ती नाही ज्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे आणि लोकसभेचे सदस्यत्व गेले आहे. त्यांच्या आधी 17 खासदारांनी सदस्यत्व गमावले, मग त्यावेळी लोकशाही धोक्यात नव्हती, फक्त राहुल गांधींच्या बाबतीत लोकशाही धोक्यात आली ? असा प्रश्न त्यांनी केला.

राहुल गांधींना ज्या कायद्यानुसार सदस्यत्व मिळाले तो कायदा आम्हाला बदलायचा नाही, तर काँग्रेसला तो बदलायचा होता, असेही ते म्हणाले. त्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारने अध्यादेश आणला होता, तो राहुल गांधींनी जाहीरपणे फाडला होता. तो अध्यादेश आला असता तर कदाचित राहुल गांधी आज कारवाईपासून वाचले असते.

Amit Shah ‘खरी शिवसेना आमच्यासोबत, सत्तासंघर्षांवर अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

तपास यंत्रणांच्या गैरवापराचा प्रश्न आहे, मी काँग्रेसच्या मित्रांना सांगू इच्छितो, तुम्ही कोणाकडे एक बोट दाखवले तर चार बोटे तुमच्या बाजूला होतील. तुमच्या राजवटीत या देशातील जनतेने सर्व काही पाहिले आहे. पण आम्ही कधी काळा फेटा आणि काळे कपडे घातले नाहीत. ही कायदेशीर बाब आहे, कायद्यावर विश्वास असला पाहिजे, तुम्ही निर्दोष असाल तर कायदा तुम्हाला सोडून देईल.

https://www.youtube.com/watch?v=3UO3ck6BkDU

Tags

follow us